पोस्ट्स

जुलै ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विलक्षण प्रतिभेचा, बहु आयामी , हळव्या मनाचा सिने दिग्दर्शक, सिने निर्माता..... गुरूदत्त

इमेज
    आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक, सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत की,  ज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे न होता, काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते. दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो. अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमार शिवशंकद पदूकोन अर्थात गुरुदत्त .   अत्यंत हळव्या मनाचे, प्रतिभाशाली बहू आयामी सातत्याने नाविन्याचा ध्यास असणारे बाँलीवूडमधील सिने निर्माते सिने दिग्दर्शक म्हणून तै सुविख्यात आहेत.9जूलै ही त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली. आज गुरुदत्त यांना आपल्यामधून जावून 50 वर्षांपेक्षा अधिक कालखंड उलटला आहे. मात्र त्यांचे चित्रपट आज देखील काळजाला भिडतात, आपलेच जीवन तर चित्रपटात दाखवले नाही ना, असे वाटावे इतके सत्यदर्शनी चित्रपट त्यांनी दाखवले. चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने आधूनिक तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरै देखील केले. चित्रपटाचा समाजावरील परीणाम