पोस्ट्स

फेब्रुवारी ९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्याने ......

इमेज
                          आपण अनेकना सांगताना बघतो की ,  मी पर्यटनाच्या निमित्याने  अनेक भागांमध्ये , शहरात फिरतो . मात्र एका प्रश्नाचे ते अजिबात उत्तर देत नाहीत, तो म्हणजे पर्यटन करतात , म्हणजे  ते नक्की काय करतात ? ते ज्या नव्या प्रदेशाना भेटी देतात , तिथल्या लोकांमध्ये सहभागी होतात? तेथील स्थानिक परिवहन व्यवस्थेने फिरतात की ? की तेथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात ? मी स्वतः अनेकदा विविध राज्यांच्या परिवहन सेवा जसे गुजरात राज्य परिवहन महामंडळ , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळ वगैरे . आदींनी फिरतो . मी संबंधित ठिकाणी फिरण्यासाठी प्रामुख्याने सध्या बसेस वापरतो . तसेच बसेसमध्ये शक्यतो खिडकीची जागा घेण्याचा माझा कल असतो . प्रवास रात्रीचा असेल तरी मी प्रवासात शक्यतो झोपत नाही . रात्रीच्या अंधारात काय बघतो ? असा सहप्रवाशांच्या प्रश्न असतो . मात्र मी खिडकीची जागा शक्यतो सोडत नाही . मला मी ज्या शहारत जातो, तेथील ऐतिहासिक स्थळांपेक्षा स्थानिक परिवहन सेवांमार्फत फिरायला आवडते . मी शक्यतो एकटा फिरतॊ . त्यावेळी आलेल्या अनुभवांवरून  मी बोलत आहे .