पोस्ट्स

चालू घडामोडी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

इमेज
आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल. भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्या...

नेमीची  येते अवकाळी 

इमेज
  मी हा मजकूर लिहीत असताना पुणे शहर परिसरात अवकाळी पावसामूळे नागरिक धास्तावले आहेत. २ एप्रिल रोजी दुपार आणि सायंकाळच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे पुणे परिसरात एका मराठी वाक्यप्रचाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेली आहे तो म्हणजे ' नेमीची  येते अवकाळी'   नेमेची येतो पावसाळा या मराठी वाक्यप्रचारात  पावसाळी  या शब्दाचा जागी अवकाळी हा शब्द बदल करत  ही चर्चा रंगली आहे  तसे बघायला गेले तर पुणेकरांनी केलेला बदल योग्यच हे ना ? मागील गेल्या ४ ते ५  वर्षाचा आढावा घेतला तर या वर्षात मार्च  ते मे महिन्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आढळेल, आणि हेचक्र असेच सुरु राहणार असल्याचे अनेक हवामान तज्ज्ञ सांगत आहेच .तुम्ही जर या पावसाचे फोटो व्हिडीओ फेसबुक सारख्या सोशल मीडियावर अपलोड केले असतील तर पुढच्या वेळी तुम्ही  फेसबुक मेमरी बघताना बाहेर पाऊस पडत असेलच असे हे तज्ज्ञ सांगत आहेत.  मात्र असे असले तरी  देखील या समस्येवर आपल्याकडे ठोस उपाययोजना करण्याबाबत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असल्याचे चित्र मला तरी दिसत आहे आपणांस ...

'विवेक भीमनवार' सर हे कराचं !

इमेज
  'मा.  विवेक  भीमनराव सर  स.न. वि.वि. सर सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.. !!.  आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला खऱ्या अर्थाने लोकसेवा या शब्दला सार्थ ठरवणारे  करावे या एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार म्हणून माझ्याकडून आपल्याला सदिच्छा !! सर, गेल्या एक ते दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार अधिक उत्तम कार्यक्षम व्हावा यासाठी आपल्या आधीच्या अध्यक्षांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग आणि अन्य  लोकसेवा आयोगाचा अभ्यास दौरा केला होता. त्यांनी केलेल्या शिफारशी शक्य तेव्हढ्या लवकरात लवकर अंमलात येऊन अक्षरशः पोटाला चिमटा घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू अधिकाऱ्यांचा कष्टाचा अंत व्हावा ही आमची माफक अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असे म्हणायला हरकत नसावी.  सर  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार वेगाने केंद्रीय  लोकसेवा आयोगाचा धर्तीवर होत आहे .मुख्य परीक्षेची पद्धत पूर्वीप्रमाणे दीर्घोत्तरी होत आहे. ही बाबा कौतुकास पात्रच आहे यात शंका नाही. मात्र आपल...

रेल्वेच्या रो रो सेवेचा विस्तार करण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट

इमेज
मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवर एक ज्वलनशील टँकर उलटल्राने सुमारे ३६ तास वाहतूक बंद राहिली. या घटनेतून रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेचे महत्त्व पुन्हा अधोरेखीत झाले. काही विशिष्ट पदार्थ घेऊन जाणारे ट्रक रो रो सेवेच्या माध्यमातूनच पाठवाण्याची सक्ती करण्याची गरज आहे. सध्या रेल्वेची रोल ऑन रोल ऑफ (रो रो) ही सेवा प्रामुख्याने कोकण रेल्वेवर वापरली जाते.या सेवेचा विस्तार मुंबई- पुणे सारख्या ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.त्या ठिकाणी सुद्वा  करण्याची गरज आहे. हे आपणास या अपघाताने दाखवून दिले आहे. भारतीय रेल्वे मालवाहतूकीसाठी सात वेगवेगळ्या प्रकारच्या वँगन वापरते.त्यातील BRN या प्रकारच्या वँगनचा उपयोग विविध प्रकारचे ट्रक, रणगाडे वाहून नेण्यासाठी होतो. कोकणामध्ये जी रो रो नावाने परीचीत असणारी सेवा रेल्वेमार्फत देण्यात येते, त्यासाठी या प्रकारचे वँगन वापरले जातात. रो रो  हा शॉर्टफॉर्म आहे. याचे पूर्ण नाव रोल ऑन रोल ऑफ असे आहे. रोल ऑन रोल अर्थात रो रो या सेवेत  ट्रक, कार थेट रेल्वेच्या डब्यावर चढवले जातात. रेल्वे मार्फत इच्छित स्थळी पोहोचल्यावर हे ट्रक पुन्...

महाराष्ट्राने गमवला एक अष्टपैलू हिरा

इमेज
माझी २८ जानेवारीची सकाळ उजाडली ती एका धक्कादायक बातमीने. सकाळी ऑफिसाठी तयार होत बसस्टॉपवर बसची वाट बघत असताना,एका जवळच्या मित्राचा फोन आला. मित्राने त्याने  ऐकलेल्या एका बातमीचा खरेपणा समजून घेण्यासाठी फोन केला होता. बातमी होती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची.  फोन केल्यावर बातमी खरी आहे का, हे बघण्यासाठी न्युज चॅनल चे युट्यूब चॅनेल बघितल्यावर दुर्देवाने ती खरी असल्याचे समजले आणि  मी राष्ट्रवादीचा समर्थक नसलो तरी वाईट वाटले   स्व पक्षातील असो किंवा विरोधक सर्वच जणांशी त्यांच्या दांणगा जनसंपर्क होता.‌जनतेसाठी ते कायम उपलब्ध असायचे. त्यांचा दिवस भल्या पहाटे सुरु होयचा.सरकारी अधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामन्य जनता यांच्याशी भेटायला ते पहाटे सहापासून  सुरूवात करायचे.   अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून कारकिर्द अत्यंत धाडसी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेली म्हणून ओळखली जाईल. विक्रमी पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवले‌‌. संघटनात्मक कौशल्य, जलद विकासकामे आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे दादा 'ॲक्शन-ओ...

८० तासाला एक

इमेज
८० तासाला एक हा दर आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा. गेल्या वर्षी तब्बल ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.मात्र या ११० चित्रपटांनी किती कमाई केली, याची माहिती घेतली असता समोर येणारे चित्र खुपच विदारक आहे.या मराठी चित्रपटांची एकत्रीत कमाई आहे, फक्त ९९ कोटी रूपये‌. सरासरी एका चित्रपटाची कमाई येते ९० लाख रूपये. सुमारे १० कोटी मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचे हे कटू वास्तव आहे. २०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांच्या एकत्रीत कमाईला महाराष्ट्राचा लोकसंख्येने भागले असता समोर येणारे चित्र भीषण हा शब्द हास्यास्पद वाटावा असे आहे.महाराष्ट्रातील जनतेने २०२५ वर्षात  मराठी चित्रपटावर खर्च केलेली रक्कम आहे तब्बल १० रूपये प्रती व्यक्ती. एक कप चहाच्या किंमती एव्हढी रक्कम खर्च करण्याचे मोठे औदार्य महाराष्ट्रातील मराठी जनतेने दाखवले आहे. मराठी चित्रपटांनी यावेळी एकत्रीत मिळवलेल्या कमाईला चित्रपटाच्या संख्येने भागले असता चित्रपटाचे जे सरासरी उत्पन मिळते ते आहे ९०लाख रुपये. पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये ६५० ते १३०० स्...

असे अधिकारी न झालेलेच बरे

इमेज
पुणे शहरात नविन वर्षाची सुरवात झाली ती आंदोलनाने. महाराष्ट्र पोलिस दलात भावी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यासाठी होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी  वयोमर्यादेत वाढ करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले. या पुर्णत: चूकीच्या गोष्टीसाठी सुरू झालेल्या आंदोलकांना त्यांची योग्य जागा दाखवत राज्य सरकारने त्यांचा मागण्यांना वाटाण्याचा अक्षता दाखवल्या,जे योग्यच आहे. जाहिरात उशीरा आल्यामुळे काही जणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे, असे अत्यंत हास्यापद कारण आंदोलकांनी दिले होते‌. ज्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची किमान आवश्यकता ही पदवी आहे.जी वयाच्या २१ व्या वर्षी फार फार उशीरा म्हटले तर २३ वर्षाचे झाल्यावर मिळून जाते.तीला ३०/३२ वय एव्हढे वय ही अंतीम मुदत असताना या भावी अधिकाऱ्यांना त्यात १ वर्षाची वाढ हवी होती. समजा मास्टर ड्रिग्री मिळाल्यावर त्यांनी या परीक्षेचा विचार केला तर ते २३ किंवा २५ व्या ते या परिक्षेचा अभ्यास सुरू करतील. आता हा अभ्यास सुरु केल्यावर अंतीम वयोमर्यादा होणेपर्यत जी ५ ते ७ वर्षे काही उदाहरणात तर तब्बल ९ वर्ष मिळतात. त्यात त्यांना अरे हे मला जम...

सिंहावलोकन २०२५ :,जागतिक घडामोडी

इमेज
नविन ग्रेनियर वर्ष २०२६ सुरु होण्यास आता अत्यंत कमी वेळ शिल्लक राहिला आहे.त्या अर्थाने हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहे.हा आढावा क्षेत्र निहाय घेतल्यास उत्तम ठरेल असे मला वाटल्याने मी तो क्षेत्रनिहाय घेत आहेत.या लेखात आपण जागतिक घडामोडी बघूया २०२५ हे वर्ष जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने निर्णायक ठरले. कोविडनंतरच्या पुनर्बांधणीचा टप्पा संपत असताना जगाने नव्या भू-राजकीय वास्तवाचा सामना केला. जागतिक GDP वाढ सरासरी ३ टक्क्यांच्या आसपास स्थिरावली असली, तरी अमेरिका, चीन, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील वाढीचे दर असमान राहिले. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुमारे २ टक्के वाढीसह स्थिर राहिली, तर चीनची वाढ ४.५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान मर्यादित झाली. रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अस्थिरता यामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाला. कच्च्या तेलाचे दर सरासरी ८०–९० डॉलर प्रति बॅरल दरम्यान राहिले, ज्याचा थेट परिणाम महागाईवर झाला. अनेक विकसित देशांमध्ये महागाईचा दर ३–४ टक्क्यांपर्यंत खाली आला, मात्र विकसनशील देशांसाठी अन्न व ऊर्जा किंमती अजूनही आव्...

सिंहावलोकन २०२५ भारत आणि जग (शेजारील देश वगळून )

इमेज
  आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे‌? २०२५ हे वर्ष भारताच्या जागतिक सहभागासाठी महत्त्वाचे ठरले. शेजारील देश वगळता अमेरिका, युरोपियन युनियन, आफ्रिका, मध्य-पूर्व, जपान, दक्षिण कोरिया व लॅटिन अमेरिका यांच्याशी भारताचे आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक संबंध अधिक सुदृढ झाले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्थिर, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून आपली प्रतिमा बळकट केली. आर्थिक आघाडीवर २०२५ मध्ये भारताचा एकूण माल व सेवा व्यापार सुमारे ८०० अब्ज अमेरिक...

सिंहावलोकन २०२५ : क्रीडा क्षेत्र

इमेज
    लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२६चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना , सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र  , विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील    क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख.    हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले   २०२5 हे वर्ष भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी व्यावसायिकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि पायाभूत विकास यांचा संगम दर्शवणारे ठरले. ऑलिम्पिक सायकलच्या तयारीच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारांनी प्रशिक्षण, विज्ञानाधिष्ठित कोचिंग आणि खेळाडूंच्या कल्याणावर भर दिला. क्रीडा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘खेलो इंडिया’ अंतर्गत वार्षिक गुंतवणूक सातत्याने वाढत असून, देशभरात १,००० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे सक्रिय झाली. अ...

सिंहावलोकन २०२६: क्रीडा क्षेत्र

इमेज
लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२६चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना , सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र  , विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील    क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख.    हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले   २०२5 हे वर्ष भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी व्यावसायिकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि पायाभूत विकास यांचा संगम दर्शवणारे ठरले. ऑलिम्पिक सायकलच्या तयारीच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारांनी प्रशिक्षण, विज्ञानाधिष्ठित कोचिंग आणि खेळाडूंच्या कल्याणावर भर दिला. क्रीडा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘खेलो इंडिया’ अंतर्गत वार्षिक गुंतवणूक सातत्याने वाढत असून, देशभरात १,००० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे सक्रिय झाली. अॅथ...

सिंहावलोकन २०२५ : नैसर्गिक अपत्ती

इमेज
लवकरच नविन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष २०२६सुरु होईल. त्यावेळी सरत्या २०२५मध्ये आपणास काय अडचणी आल्या ,  काय आनंदाचे क्षण आपण अनुभवले    याचा धांडोळा घेतल्यास आपण नविन वर्षाचे स्वागत अधिक उत्तमपणे करु शकु ना  ? हीच बाब हेरत मी सरत्या वर्षातील घटनांचा , प्रसंगाचा क्षेत्रनिहाय विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात आपण सरते वर्ष २०२५ मध्ये कोणत्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागले.याचा आढावा घेवूया.नैसर्गिक आपापतीचा मानवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात पुर्नवसन करावे लागत असल्याने प्रशाकीय यंत्रणेवर देखील मोठा    ताण येतो त्यामुळे त्या महत्वाच्या ठरतात                         आपण नैसर्गिक आपत्तीचे भूगर्भात घडणाऱ्या घडामोडीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करून शकतो . भूगर्भात होणाऱ्या आपत्तीमध्ये भूकंप ,  ज्वालामुखी यांचा समावेश करता येईल तर हवामान बदलामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आपण अवर्षण दुष्काळ ,  प...

*अशी झाली मानवाच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात*

इमेज
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वीवर मानव करत असलेल्या निसर्गाच्या हानीमुळे मानवाला नजीकच्या भविष्यकाळात आपला मुक्काम पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर किंवा किमान अंतराळ स्थानकावर काढावा लागेल, असे विधान केले होते. तसेच मानवाला आवश्यक असणाऱ्या अनेक धातूंचा साठा पृथ्वीवर तर इतर ग्रहावर मोठ्या प्रमाणात असल्याने तो पृथ्वीवर आणणे सोपे व्हावे, यासाठी अंतराळात मानवाला सहजतेने राहता यावे, यासाठी काय करता येईल? अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाचा मानवावर काय परिणाम होईल? याचा अभ्यास विसाव्या शतकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात सुरू झाला. रशियाचे मीर अवकाश स्थानक, अमेरिकेचे स्काय लॅब हे अंतराळ स्थानक असो, किंवा सध्या वापरात असलेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक असो, किंवा आता वेगाने आकारास येणारे चीनचे अवकाश स्थानक असो, किंवा भारताकडून अंतराळ स्थानक उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना — हे त्यातीलच काही महत्त्वाचे टप्पे. मानवाची अंतराळात थेट वस्ती करण्यासाठीच्या उपाययोजना जरी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या असल्या तरी यामागच्या कल्पनेचा मोठा इतिहास ...

इथेही 56

इमेज
विद्यमान सत्ताधिकारी वर्गाकडून या पुर्वी अनेकदा 56इंच छाती आहे आमची, असे सांगितले जात असल्याचे वाचकांना आठवत असेलच .स्व अभिमान सांगण्यासाठी वापरण्यात येणारा 56 हा आकडा सत्ताधारी वर्गाला खुपच प्रिय असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्याकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच देण्यात आला आहे. मुळातच तूटपुंजा असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार  कमी केल्याने त्यांचा समोर जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.        एसटी महामंडळाच्या या दुखण्यावर काय उपचार करायचे ? हे माहिती आहे पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी योग्य ते उपाय होत नाहीये‌.सध्या एसटी महामंडळाला अतिशय मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. वरवरची मलमपट्टी स्वरूपात आर्थिक मदत देवून वेळ मारली जाते ती पुन्हा एकदा मदत देण्याची स्थिती येण्यापर्यत.हे चक्र भेदणे हे संकट दुर करण्यासाठी अत्यावश्यक आहे. देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कित्येक सवलती आपल्या महामंडळाकडून देण्यात येतात ,समाजसेवेच्या नावाखाली,जसे या सवलती देण्याचा ठेका महाराष्ट्र एसटी महामंडळानेच घेतलाय‌....

पुन्हा एकदा संतोष माने!

इमेज
.    ती नेहमीप्रमाणे पुण्यातील एक सकाळ होती सुट्टीचा दिवस नसल्याने सर्वजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते मात्र काय त्यांच्यावर ओढवणार आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. त्यावेळी अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाण असणाऱ्या स्वारगेट परिसरात एका एसटी बस ड्रायव्हरने बस भरधाव पणे बस चालवत नऊ जणांना मृत्युमुखी पाडले तर किमान 30 जणांना गंभीरित्या जखमी केली  आज ही  घटना संतोष  माने प्रकरण या नावाने प्रसिद्ध आहे. ही घटना घडली 25 जानेवारी 2012 रोजी त्यानंतर या प्रकरणातील आरोपी संतोष माने यांच्यावर पुणे सत्र न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला . पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी संतोष माने यांना फाशीची शिक्षा सुनावली मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते हे कृत्य करताना तणावात होते असे निरीक्षण नोंदवात त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. आज संतोष माने येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय . संतोष माने यांनी वरिष्ठांचा जाचाल कंटाळून हे कृत्य केले होते मात्र आज हे वरिष्ठ शांतपणे आपल्या घरात बसले असतील.आणि संतो...

एसटी महामंडळाची उलट गंगा!

इमेज
    सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे  प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे  महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या  बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो  आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून  प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे‌.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता  हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीच...