पोस्ट्स

मे १०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगात हेबी घडतंय

इमेज
                     सध्या कोणतेही प्रसारमाध्यम बघीतले तर आपणास सर्वत्र कोरोनामुळे समाजातील विविध घटकांचे होणारे हाल, त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अश्या प्रकारच्या बातम्याच दिसतात . कोरोना भयंकर आहेच.याबाबत शंकाच नाही, मात्र काळ्याकुट्ट अंधारात एखादी मिणमीणती पणतीसुद्धा आशेचा किरण मनात तेवत ठेवते, त्याप्रमाणे एक सकारात्मक बाब सध्या जगाच्या क्रिडा विश्वात घडत आहे,माझे आजचे लेखन त्या बाबीवर आपले लक्ष वेधण्यासाठी . जगात सकारात्मक तरंग निर्माण करणारा तो खेळ आहे , बुद्धीबळ .आपल्या भारतीय भुमीवर निर्माण झालेला हा खेळ .                               तर मित्रांनो या बुद्धीबळाच्या विश्वातील मानाची समजली जाणारी नेशन कप ही स्पर्धा 5मे ते 10मे या कालावधीत पार पाडली .  फिडे अर्थात फेडरेशन इंटरनँशनल डिईचेस या बुद्धीबळ या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत आणि चेस डाँट काँम या संकेतस्थळाच्या सहकार्याने ही स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने पार पडली.(दरवर्षी होणारी ही स्पर्धा ईतरवेळी आँफलाईन पद्धतीने होते)मित्रांनो जरी बुद्धिबळ हा वैयक्तिक खेळ असला तरी ही स्पर्धामात्र गटाच्या मा