भाषा प्रेम खरे आणि बेगडी
सध्या मराठी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांबाबबत इत्यंभूत माहिती देत असताना, भारताच्या उत्तर बाजूला असणाऱ्या एका राज्यातील एका मानांकित विद्यापीठात मात्र वेगळेच नाट्य रंगतंय . आम्हला एक भाषा विषय शिकवायला अमुक एक प्राध्यापक नको , या कारणासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे . सदर प्राध्यापक विषयातील तज्ज्ञ आहेत, त्यांच्यावर कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलेला नाही . ते विद्यार्थ्यांना समजेल अश्या पध्द्तीने शिकवतात . मात्र तरीही हे प्राध्यापक या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नकोय . या विद्यार्थ्यांना यासाठी फार मोठे आंदोलन करायला सुरवात केली आहे .विद्यार्थ्यांचे आंदोलन का होत आहे ? याचा मागोवा घेतल्यास मन निराश करणारी परिस्थिती सम...