पोस्ट्स

एप्रिल ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तूच आहे तूझा मारेकरी

इमेज
              नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगात ज्यात भारत देखील आला, त्यात खुनापेक्षा जास्त लोकांचे मृत्यू हे आत्महत्येमुळे होत आहे. जगात मेलेल्या व्यक्तींच्या कारणांची क्रमवारी बघीतल्यास त्यास आत्महत्याचा क्रमांक बराच वरचा आहे. भारतासह जगभरातील स्थिती किती धोकादायक आहे? याची ही लिटमस्ट टेस्टच म्हणायला हवी, खुन हा दुसऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतो.मात्र आत्महत्या हा स्वतः चाच हाताने स्वतःचा केलेला विनाश असतो.त्याची संख्या जास्त दिसून येणे समाजाच्या अनारोग्याचेच स्पष्ट लक्षण आहे.              माणसे विविध कारणांनी आत्महत्या करतात,ज्यामध्ये  एखादा असाध्य विकार, कौंटुबिक ताणतणाव, व्यसनाधिनता, आर्थिक परीस्थिती खालवणे,जवळच्या व्यक्तींकडून होणारी भावनिक फसवणूक आदि कारणांचा समावेश करावाच लागेल.कारण काहीही असले तरी , त्यांची संख्या चिंताजनक आहे, याबाबत कोणालाही संशय नसावा            वाढती गळेकापू स्पर्धा,व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक करत त्याचे स्वैराचारात झालेले रुपांतर, कौटुंबिक पातळीवर संवाद नसणे, मानसोपचार तज्ज्ञांची फी परवडणारी नसणे, यामुळे व्यक्तींना ह