पोस्ट्स

सप्टेंबर २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाउस बदलला आहे का ?

इमेज
              पाउस बदलला आहे का ? असा प्रश्न सध्या  महाराष्ट्रात तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या सर्वांकडून विचारला जात आहे. आमच्या लहानपणी इतका मुसळधार पाउस पडत नव्हता, असेच वाक्य जो तो बोलत आहे आधी कोकणात धुमाकूळ घातल्यावर आता मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाने नाकात दम आणला आहे . पूर्वी साधारतः उत्तर भारतात आणि ईशान्य भारतात दिसणारे पुराचे चित्र आज महाराष्ट्रात दिसत आहे . त्यामुळे या  विचारल्या जाणाऱ्या प्रश्नात खरोखरीच अर्थ आहे हे स्पष्ट होत आहे            पाऊस बदलला आहे का ? या प्रश्नाचे ऊत्तर एका वाक्यात देयचे झाल्यास,  पूर्णतः नाही मात्र काही प्रमाणात पाऊस  बदलला आहे असे म्हणावे लागेल . आपल्याकडे जून ते सप्टेंबर या चार  महिन्यात जर सरासरीचा  विचार करता क्ष मिलिलिटर पाऊस पडत असेल तर आज 2021 मध्ये सुद्धा क्ष मिलीमीटर पाऊसच पडतोय तो कमी किंवा जास्त झालेला नाहीये . बदलली आहे ती त्याची कोसळल्याची पद्धत . पूर्वी हा क्ष मिलीमीटर पाऊस जर चार टप्यात विभागून पडत असेल,  तर सध्या मात्र या चार टप्याऐवजी दोन ते तीन टप्यातच सगळा पाऊस पडत आहे . पावसाचे प्रमाण तितकेच राहून त्याचे पडण्याचे टप्पे कमी झाल