पोस्ट्स

जून १२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाने क्यू ?

इमेज
                  दिनांक ९ आणि १० जूनला ला मला माझे दोन जूने सध्या संपर्कात नसणारे मिञ भेटले होते त्यातील एकाशी माझा एकाशी चांगली मैञी होती.  तर एकाशी सर्वसाधरण मैञी  होती.  सर्वसाधरण मैञी असणाऱ्या  मिञाचा महाविदयालयीन अभ्यासात एक विषय कच्चा होता, तर दुसरा विषय माझा कच्चा होता.  एकमेकांचे कच्चे विषय माञ दुसऱ्याचे हुकुमी विषय होते . त्यामुळे अभ्यासात मदत करताना आमची मैञी झाली.  कांलातराने महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आमचे भेटणे कमी होत होत बंद झाले,  आणि  जवळपास  4वर्षांनी तो मला भेटला.  दुसऱ्याची मेञी माञ सहज अश्या कोणत्याही कारणाविना झाली होती,  हा मिञ माझे महाविद्यालयीन शिक्षण संपून 5वर्षे झाले तरी  अजून चांगल्या संपर्कात आहे . जरी प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी व्हॉटसप फेसबुक, एस एम एस च्या माध्यमातून संपर्कात आहे तर हे दोन्ही मिञ मला अचानक भेटले.  दोन्ही वेळेस आम्ही हॉटेलमध्ये गेलो ज्या मिञासी अभ्यासातील काठिण्यामुळे मैञी झाली होती त्याच्याशी गप्पा फारशा रंगल्या नाहीत या उलट दुसऱ्या  मिञासी प्रचंड प्रमाणात गप्पा रंगल्या .                            तेव्हा पासून माझ्या

भुतकाळात डोकवतांना जून महिना

इमेज
    काही माणसे जन्माला येतानाच खुप चांगले नशिब घेवून येतात असे बोलले जाते. पण हे तेव्हढ्यापुरतेच मर्यादित नाही, ही गोष्ट काही महिन्याना पण लागू होते. माझा जन्म महिना अर्थात आँगस्ट आणि जून हे त्यातीलच काही महत्वाचे  महिने . जून महिन्यात आँपरेशन ब्ल्यू स्टार, सिक्किमचे विलीनीकरण,  भारताचा स्वातंञ्याचा कायदा व आणिबाणी या महत्वाचा घटना घडल्या. त्यातील आँपरेशन ब्ल्यू स्टार विषयी मी याचा आधीच बोललो आहे      भारताला ब्रिटिशांपासून ज्या कायदान्वये स्वातंञ्य मिळाले तो भारताचा स्वातंञ्याचा कायदा 3 जून 1947 ला ब्रिटिश संसदेत समंत झाला . त्या कायदान्वये भारतीय संस्थाने  स्वतंत्र झाली त्यांचावर भारतात किंवा पाकिस्तानात  सामील होण्याचे बंधन टाकण्यात आले नाही.  परिणामी काश्मीर स्वतंञ्य राहिले व ईतिहास आपणास माहिती आहेच .       भारतात कुटुंब नियोजन वगैरे कार्यक्रमाची सक्ती करणाऱ्या आणीबाणीचचे 2019 हे साल चव्वैचाळीसावे आहे . हा मानवी आयुष्याचा बाबतीत मोठा कालावधी आहे. त्या वेळेस या घटनेने वादळ निर्माण केले होते .लोकांचा मनात क्राँग्रेसविरोधी जनमत तयार करण्यात या घटनेचा मोठा वाटा होता . भारतीय रा