पोस्ट्स

जानेवारी १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन दुर्लक्षीत रघूनाथरावांना

इमेज
    आपल्या मराठी लोकांचा इतिहासाकडे नजर टाकल्यास मराठी भाषिकांचा इतिहास दोन रघूनाथरांवांशिवाय पुर्ण होणे अशक्यच. त्यातील एकाला खलनायक असुनही अमाप प्रसिद्धी मिळाली. दुसऱ्या रघूनाथरावांचे कार्य अतूलनीय असून देखील जिवंतपणी आणि मृत्यूनंतर देखील त्यांचा वाटेला उपेक्षाच आली. खलनायक असणारे रघूनाथराव म्हणजे रघूनाथराव पेशवे.तर अत्यंत गौरवास्पद कार्य करुन देखील उपेक्षीत राहिलेले रघूनाथराव म्हणजे गणिताचे प्राध्यापक असणारे श्रेष्ठत्तम समाजसेवक रघूनाथराव धोंडो कर्वे.1888 जानेवारी14 ही त्यांची जन्मतारीख ,म्हणजेच आज 2021 साली त्यांची 133 वी जयंती. त्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा .         ज्या काळात महिलांचे देखील आरोग्याचे काही प्रश्न असतात, कुटुंबनियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे, याची कल्पना करणे देखील सर्वसामान्य जनतेच्या गावीही नव्हते, अश्या काळात, या विषयांवर समाजात जागृती करण्याचे कार्य  त्यांनी केले. त्यासाठी प्रसंगी बंदीवास देखील भोगला. मात्र कितीही संकटे आली तरी आपल्या तत्वापासून कसुभरही ढळले नाहीत. अविरतपणे ते आपले कार्य करत राहिले. फक्त लोकांना समाजसुधारणेचे धडे देयचे, मात्र स्वतःच्या

राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने -

इमेज
  भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे  . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ?  सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ? अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,     भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .     तो परत स्थापित व्हावा या साठी साजरा करण्यात येतो तो राष्ट्रीय हवामान दिवस . जो मकर संक्रांती च्या दिवशी साजरा करण्यात येतो . त्या निमित्याने भूगोल  विषयावर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा