पोस्ट्स

नोव्हेंबर २२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असे बनले संविधान (भाग 3)

इमेज
      मित्रांनो, आपले भारतीय संविधान जगातील काही मोठ्या संविधानापैकी एक आहे, अमेरीका देशाचे संविधान (देशाचे संविधान त्यातील राज्यांचे नव्हे) फक्त 7 कलमे आहेत .तर  भारतीय संविधानात 395 कलमे आहेत. या संविधान निर्मितीची प्रक्रीया कसी कसी विकसीत झाली ? यामध्ये कोणते टप्पे होते ? याची 1857पर्यतची प्रक्रिया आपण या आधीच्या 2 भागांमध्ये बघीतली, ज्यांना ते वाचायचे असेल अस्यांसाठी त्या भागाच्या लिंक या लेखाच्या  खाली देण्यात आल्या आहेत.असो .                   तर 1857 साली भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय अपयशी ठरले असले तरी भारतीयांचा असंतोषाची जाणीव  ब्रिटीश शासनास झाली, आणि तो दूर करण्यासाठी 1857 आँगस्ट महिन्यात ब्रिटिश संसदेने भारतीयांनासाठी  काही  गोष्टी समंत केल्या, ज्या 1857 नोव्हेंबर मध्ये जाहिर केल्या , त्यास क्विन  अर्थात राणीचा जाहिरनामा म्हणतात. ज्यानुसार पुढील गोष्टी अमंलात आल्या . कंपनीकडून सत्ता पुर्णपणे ब्रिटीश सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली . भारतीयांविषयक कामकाजासाठी ब्रिटीश मंत्री मंडळात सेक्रेटरी आँफ स्टेटची (मराठीत भारतमंत्री)या पदाची निर्मिती करण्यात आली. जो लंडन