पोस्ट्स

डिसेंबर २०, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सृष्टीचा विलोभनीय चमत्कार सूर्यग्रहण

इमेज
         मित्रानो , येत्या गुरुवारी अर्थात 26 डिसेंबर 2019 ला आपल्या भारतात सृष्टीचा विलोभनीय चमत्कार  अर्थात सूर्यग्रहण होणार आहे .  हे ग्रहण कोणत्या प्रदेशात दिसणार आहे . हे आपण बाजूच्या नकाश्यात बघू शकता . मित्रानो हे  ग्रहण भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा अपवाद वगळता सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे . तर केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती दिसणार आहे त्यामुळे पूर्ण सूर्यग्रहणात दिसते , त्या प्रकारचे नाट्य या वेळी दिसणार नसले तरी हा सृष्टीचा चमत्कार  आपण बघायलाच हवा . मात्र चंद्रग्रहण आपण ज्या प्रकारे उघड्या डोळ्याने बघू शकतो . तसे ना होता , योग्य ती काळजी घेऊन अर्थात विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरून हे नाट्य बघायला हवे . जर उघड्या डोळ्याने बघितल्यास डोळ्याला जबर हानी होऊ शकते                                            हे नाट्य सुरु होईल, भारतीय   प्रमाणवेळेनुसार सकाळी 8वाजून 4 मिनिटांनी,  तर याची सर्वोच्च स्थिती सकाळी 9वाजून 22मिनिटांनी असेल , आणि हे नाट्य संपेल, सकाळी 10वाजून 55मिनिटांनी .  या नंतर आपल्या भारतात सूर्यग्रहण  दिसण्यासाठी  21 जून 2020  पर्यंत वाट बघावी