पोस्ट्स

जुलै ३१, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंडित नेहरू थोरच

इमेज
     नुकतेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजकार्य असणाऱ्या एक ज्येष्ठ छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी एक विधान केले ज्या विधानामुळे महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणत वादंग उठला . त्या विधानामुळे भारताच्या आतापर्यतच्या वाटचालीत पंडित नेहरूंचे योगदान नक्की किती ?या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली त्याविषयीची वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लेखन पंडित नेहरू थोरच      तर मित्रानो , पंडित नेहरूंच्या कार्यकाळात पंडित नेहरूंच्या काही चुका झाल्या हे मान्य केले तरी त्यांचे योगदान पूर्णतः नाकरण्यासारखे नाही . दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात ९० देश वसाहतवादातून स्वतंत्र झाले या देशांनी लोकशाहीची वेगवेगळी स्वरूपे स्वीकारली . काही देशांनी अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारली तर भारतासारख्या काही देशांनी इंग्लडच्या धर्तीवर लोकशाहीची पद्धत जिला वेस्ट मिनिस्टर पद्धत म्हणतात ती स्वीकारली आज त्यानंतर सुमारे ७० ते ७५ वर्षांनी त्या त्या देशातील लोकशाहीची स्थिती आणि भारतातील लोकशाहीची स्थिती याचा आढावा घेतल्यास आपणस आपणस अनेक देशातील लोकशाही जवळपास संपल्यातच जमा झालेली दिसते