पोस्ट्स

जुलै १२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनोहारी चमत्कार सृष्टीचा चंद्रग्रहण

इमेज
 येत्या मंगळवारी अर्थात 16 जुलैला आकाशात एक अत्यंत मनोहारी दृश्य दिसणार आहे . यावेळी रात्री एक वाजून बत्तीस मिनिटांपासून पहाटे चार वाजेपर्यंत  आपल्याला आपला लाडका चंद्र काहीसा लाल झालेला दिसेल . मात्र घाबरू नका , तो कोणावर चिडल्याने लाल होणार नसून त्याला ग्रहण  लागल्याने तो लालसर होणार आहे . मित्रानो ग्रहण हा एक  सृष्टीचा एक मनोहारी चमत्कार आहे . तो तुम्ही अवश्य बघावा . येत्या मंगळवारी दिसणारे हे वर्षातील दुसरे मात्र भारतातून दिसणारे पहिले चंद्रग्रहण असणार आहे . तुम्ही खालच्या नकाश्यात हे ग्रहण कोणकोणत्या भागात दिसत आहे , हे बघू शकतात . तुम्ही  बघू शकतात . संपूर्ण आशिया खंड , युरोप खंड अंटार्टिका , दक्षिण अमेरिकका खंड आफ्रिका खंड या भागात हे दिसणार आहे . आणि चंद्रग्रहण आपण साध्या डोळ्याने बघू शकतो , त्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नसते . मात्र सध्याच्या पावसाळी हवेत हे ग्रहण दिसू शकेल का हा प्रश्नच आहे . आपण देवाकडे प्रार्थना करू की , मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस हवामान पूर्णतः कोरडे ठेव त्या दोन दिवसात पाऊस पडू नको रे बाबा . 17 जुलैला रात्री एक वाजून बत्तीस मिनिटांनी चंद