पोस्ट्स

बांगलादेश लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

इमेज
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हशिण यांनी देश सोडला असून त्यांनी भारतमार्गे लंडनला प्रयाण केल्याचे आपणस एव्हाना माहिती झाले असेलच . बंगलादेशमध्ये लष्कराच्या मदतीने काळजीवाहू सरकार स्थापन कऱण्यात आले असून पुढील सरकार सत्ता स्थापन करेपर्यंत हे काळजीवाहू सरकार सत्ता सांभाळेलअसे या संदर्भात विविध माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे . बांगलादेशमधील हा सत्ता बदल फक्त त्या देशासाठीच नव्हे तर आपल्या भारतासासाठी देखील अत्यंत महत्वाचा ठरणार आहे   . भारतासाठीचे बदल आपण  तीन   प्रकारात विभाजित करू शकतो . पहिल्या प्रकारात आपण ईशान्य भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात , ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी असणारा संपर्क वाढवण्यासंदर्भात सध्या   सुरु असणाऱ्या विविध उपाययोजना विचारत घेऊ शकतो . दुसऱ्या प्रकारात आपण भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या व्यापार आणि अन्य तरतुदींचा विचार करू शकतो.तर तिसऱ्या प्रकारात बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाचा विचार करु शकतो‌ ईशान्य ...

भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म

इमेज
आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.      तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी...

दक्षिण आशियाचे राजकारण बदलवणारे वर्ष २०२४

इमेज
नविन वर्ष सुरु होण्यास अजून पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक असला तरी येणारे नवीन वर्ष २०२४ फक्त भारतासाठीच नव्हे तर समस्त दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.याबतच्या  घटना घडण्यास सुरवात झाल्याने त्यांची  माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आपल्या भारतासह भुटान,बांगलादेश, पाकिस्तान या देशात त्यांच्या संसदेच्या निवडणूका तर श्रीलंकेत त्यांच्या राष्ट्रपतींची निवडणूक या२०२४ मध्ये होणार आहे.या निवडणूकांमध्ये त्या त्या देशांतील समस्त राजकीय जीवन बदलण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दक्षिण आशियासाठी हे वर्ष २०२४ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.  त्यातील भुटान या देशातील निवडणूका या भारत आणि दक्षिण आशियावर फारस्या परिणाम करणाऱ्या नसल्याने आणि भारतातील निवडणूकांबाबत अजूनही फारसी वातावरणनिर्मिती न झाल्याने त्या दोन निवडणूका काहीस्या बाजूला ठेवूया .या निवडणूकांपैकी पाकिस्तान आणि बांगलादेशातील निवडणूका भारतासाठी किंबहुना समस्त दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या असल्याने त्यावर प्रथम बोलूया          तर इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असणाऱ्या देशांचा विचार करता दुसऱ्य...

भारताचे बांगलादेशाबरोबरचे संबंध अधिक दृढ

इमेज
            आपला भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याला कारणीभूत ठरले आहे दिनांक १ नोव्हेंबर रोजी भारताच्या मदतीने बांगलादेशात  सुरु झालेले दोन विकासप्रकल्प तसेच ईशान्य भारताशी उर्वरित भारताचा संबध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या बांगलादेशमधील अखूरा ते त्रिपुराची राजधानी अगरताळा या दरम्यान सुरु झालेली रेल्वेसेवा .  व्हिडीओ कन्फसरिंग द्वारे भारतीय प्रमाणवेनुसार सकाळी साडेदहा वाजता तर बांगलादेश प्रमाण वेळेनुसार सकाळी दहा वाजता हे उदघाटन पार पडले . भारताच्या शेजारी प्रथम या तत्वानुसार हि विकासकामे करण्यात येत होती या विकासकामांमुळे चीनच्या भारताच्या शेजारील देशांना आपल्या विळख्यात अडकवून भारताला आपल्या पंज्यात घेण्याच्या कृतीला काही प्रमाणात आळा बसेल         तर मित्रानो बांगलादेशची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प बांगलादेशातील खुणला डिव्हिजन मधील रामपाल या शहरात होणार आहे या प्रकल्पातून १३२० मेगाव...

भारत बांगलादेश मैत्री नव्या वळणावर

इमेज
    बांगलादेश, भारताबरोबर जगातील कोणत्याही दोन देशांतील सिमारेषेचा  किलोमीटर संदर्भात विचार करता दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लांब सीमारेषा असणारा देश. भारताच्या मदतीने स्वतंत्र मिळालेला देश बांगलादेश. तर या बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अद्बुल मोमेन यांनी भारताकडे  बांगलादेश आणि भारताची सीमा, भारत नेपाळ किंवा भारत भुतान प्रमाणे खुली करण्याची मागणी केल्याने, भारत बांगलादेश सबंध पुन्हा एकदा चर्चेत आले. भारत सरकारने नेपाळ आणि भुटानच्या सरकारशी केलेल्या करारानुसार त्या देशातील नागरिक भारतात आणि भारतीय नागरिक त्यांच्या देशात व्हिसाशिवाय सहजतेने जावू शकतात. तिच सवलत भारताने आता बांग्लादेशाला देखील लागू करावी,असा या मागणीचा अर्थ आहे. भारताने असी सवलत  बांग्लादेशाला दिल्यास बांगलादेश देखील भारतीयांना ही सवलत लागू करेल,असे या मागणीच्या वेळी बांगलादेशाकडून सांगण्यात आले आहे ‌.                          सध्या भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असली, तरी नजीकच्या भविष्यकाळात ती जगातील तिसरी मोठी अर्थव्...

भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास प्रारंभ 

इमेज
           भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास २ मेला  प्रारंभ झाला आणि याला कारणीभूत ठरला तो बांगलादेशच्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हन्यू  ने जाहीर केलेला एक निर्णय . या निर्णयानुसार बांगलादेशची सुमारे ९० % आयात निर्यात होत असलेल्या चितगाव (बंगाली उच्चार चितोग्राम )  बंदराचा आणि बांगलादेश मधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असलेल्या मोंगला बंदराचा भारताने कयमस्वरूपी वापर करण्याची   परवानगी बांगलादेशकडून देण्यात आली आहे यामुळे ईशान्य भारतात भारताच्या अन्य भागातून काही सामान पाठवणे तसेच ईशान्य भारतातून भारताच्या अन्य प्रदेशात सामानांची पाठवणी करणे सोईस्कर झाले आहे           बांगलादेशचा वापर न केल्यास पश्चिम बंगाल मधून त्रिपुरा मिझोराम आदी  राज्यात काही सामान पाठवायचे असल्यास सुमारे दीड हजार किलोमीटरचा वळसा मारून जावे लागते हा मार्ग भारतीय सुरक्षेतीचा विचार करता संवेदनशील असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉर मधून जातो याउलट बांगलादेशचा वापर केल्यास हे अंतर काही शे किलोमीटर इतके कमी ...

2023वर्ष भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्तवाचे.

इमेज
   भारताबरोबर सीमा शेअर करणाऱ्या नेपाळ या देशात त्यांच्या संसदेसाठी नुकतेच मतदान झाले.या निवडणूकीत चीन समर्थक कम्युनिस्ट पार्टीचे सरकार नेपाळमध्ये आले. ज्यांनी सत्तेत येवून चार दिवस पुर्ण होत नाहीत तोच ,चीनबरोबर सबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणे सुरु केले,ज्यासाठी चीनबरोबर रेल्वेमार्गाने संपर्क साधणे सुलभ होण्यासाठी करावयाचा प्रयत्नांना गती देणे सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 2023साल भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्वाचे आहे.2023 या वर्षी जर पुर्वनियोजीत कार्यक्रमात बदल न झाल्यास सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात आणि आँक्टोबर महिन्यात बांगलादेशात तेथील संसदेच्या निवडणूका आहेत.             भारताबरोबर सगळ्यात जास्त भुसीमा बांगलादेश शेअर करतो . बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा इशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल यांच्या विधानसभेच्या निवडणूकीत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत कळीचा ठरत असतो. सध्या इशान्य भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत. उर्वरीत भारताबरोबर इशान्य भारताचा संपर्क वाढवण्यासाठी बांगलादेशातून रेल्व...

भारत बांगलादेश मैत्री अतूट !

इमेज
बांगलादेश एकेकाळी संपूर्ण पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालवणारा भूभाग . १९६५ साली प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार संपूर्ण पाकिस्तानच्या जीडीपीत ६५ % हुन थोडेसे अधिकचे योगदान हे त्यावेळच्या   पूर्व पाकिस्तानचे ( पूर्व पाकिस्तानला आज आपण बांगलादेश म्हणून ओळखतो )    होते त्यावेळी पाकिस्तानला मिळणाऱ्या परकीय चलनाचा विचार करता त्यातील खूप मोठा मोठा म्हणजे ६५ ते ७० % वाटा हा त्यावेळचा पूर्व पाकिस्तानमधून    करण्यात येणाऱ्या निर्यातीचा असे पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लमबाद ची उभारणी करण्यासाठी केलेल्या खर्चातील खूप मोठा वाटा हा त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान ( आताच बांगलादेश ) मधून मिळालेल्या करांतुन मिळालेल्या उत्तापाचा होता    मात्र सत्तेतील वाटा जवळपास नगण्यच . देशातील आर्थिक विकासात मोठा वाटा उचलून देखील पश्चिम पाकिस्तान ( आताच पाकिस्तान ) ची वसाहत असल्या सारखी वागणूक मिळत असल्याने देशाची निर्मिती झाल्यावर २४ वर्षातच पाकिस्तानपासून स्वतंत्र होत जगाच...