पोस्ट्स

मार्च ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एमपीएसीच्या नावाने

इमेज
आज मी तुमच्याशी बोलत असताना राज्यांभरात एमपीएससी च्या परीक्षा राडा झाल्याने परीक्षार्थींच्या अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे . कदाचित तुम्ही हा मजकूर वाचत असताना त्यांच्यावर राज्य प्रशासनाने तोडगा काढला असेलही . मित्रानो प्रशासनातील अधिकरी कर्मचारीवृंद निवडण्यासाठी  आपल्या राज्यघटनेच्या  कलम 316आणि 317 नुसार महाराष्ट्रासाठी तयार केलेला हा घटनादत्त अयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा अयोग .  या आयोगामार्फत राज्यसेवेतील पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील अधिकारी निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला तब्ब्ल पाचव्यांदा पुढे ढकलल्यामुळे परीक्षेचे उमेदवार जे पुढे प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर आरूढ होणार आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत . मी दोन कालावधीत मिळून  एकूण  पाच वर्षे पुण्यातील सदाशिव पेठे ,नवी पेठ , नारायण पेठ या भागात वास्तव्यास होतो . या भागात विविध स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अक्षरशः पोटाला चिमटा काढत पडेल तसे कामे करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात . अभ्यासिकेत जागा मिळवण्यासाठी अभ्यासिका चालकांची मुजोरी सांभाळत घरून येणाऱ्या पैशावर किंवा स्वतःच्या अन्य स्रोताद्वारे प्रचंड मेहनत करत अधिकारी