पोस्ट्स

मे ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकाचवेळी दोन वेगवेगळ्या टोकांवर असणारा प्रदेश मराठवाडा

इमेज
             गेल्या महिनाभरात दोनदा नाशिकहून मराठवाड्यात फिरण्याचा योग आला.पहिल्यांदा पर्यटनाच्या उद्देशाने जालना जिल्ह्यात फिरलो .त्यानंतर पंधरा दिवसांनी पर्यटनाच्या उद्देशाने बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली. या दोन्ही भेटी दरम्यान मला आढळलेली एक महत्तवाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील रस्त्यांची अतिशय चांगली अवस्था तसेच या उलट एखाद्या वस्तू संग्रालयात शोभावी असी ब्रिटीशकालीन रेल्वे व्यवस्था .एकाचवेळी दोन भिन्न टोकाच्या विरोधाभास असणाऱ्या वाहतूक व्यवस्था या एकाच प्रदेश्यात सुखानैव नांदत असल्याचे चित्र आपणास मराठवाडा प्रदेशात सर्व ठिकाणी सहजतेने दिसते.          बीड आणि जालना जिल्ह्याचा विचार करता अगदी खेड्याचा दारापर्यंत उत्तम, रस्त्यावर खड्डा दाखवा दहा हजार रुपये मिळवा असी योजना सुरु करावी अस्या पद्धतीचे रस्ते आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांना ,तसेच यांना जोडणाऱ्या अनेक उपरस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून त्यांचे क्राँकिटीकरण तसेच रुंदीकरण केल्याचे या जिल्ह्यात फिरताना सहज दिसून येते.या नव्याने बांधलेल्या रस्त्यावर  औषधाला देखील शोधून   खड्डा   सापडत नाही   य