पोस्ट्स

नोव्हेंबर ५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेरे पिया गये हे रंगून

इमेज
                 सध्या भारताचे आपल्या शेजारी देशांशी असलेले सबंध नव्याने वृद्धिगत होत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आदी देशांशी आपले सबंध  संबध मैत्रीच्या नव्या वळणावर आहेत . त्यातील बांगलादेशाशी असणाऱ्या घनिष्ट संबंधावर मी याआधीच लिहले आहे . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लीक करावे. मी आता बोलणार आहे .म्यानमार विषयी            आपल्या  सारखाच ब्रिटिशांची वसाहत असणारा म्यानमार या देशाच्या कारभार 1935 पर्यंत भारतातूनच चालवला जात असे . 1935साली म्यानमार आणि भारताचा कारभार स्वतंत्र करण्यात आला .1857 च्या उठावानंतर दिल्लीच्या बादशहाला आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना म्यानमारच्या तुरुंगात कैद करून ठेवले होते तर म्यानमारच्या राजाला रत्नागिरीत कैद करून ठेवले होते . हे आपण जाणतातच . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि म्यानमारचे राष्ट्रपिता ऑग सांग हे युनाटेड किंगडम मध्ये शिकत असताना एकमेकांचे जवळचे मित्र होते ,  आशियांची स्थापना करताना म्यानमारने त्याचे सदस्यत्व भारताला देऊ केले होते (जे भारताने सदर समूह हा अमेरिकेची तळी उचल