पोस्ट्स

डिसेंबर १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंकेची आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजाडली ?

इमेज
                    आर्थिक विपन्नेतेमुळे सध्या सुरु असलेल्या २०२२ वर्षाच्या सुरवातीला अत्यंत प्रकाशझोतात आलेल्या श्रीलंकेमध्ये आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजडण्याचा मार्ग वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दृष्टीस येत आहे . श्रीलंकेचे   परराष्ट्र मंत्री अली साबरी   यांनी आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारताकडून देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीमुळे येत्या ४ ते ५ वर्षात श्रीलंका पुन्हा पूर्वपदावर येईल अशा विश्वास एका खासगी भारतीय वृत्तवाहिनीतर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्याने ही   आशादायक शक्यता निर्माण झाली आहे जर भारताने त्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कक्षेत अधिक व्यापार केल्यास श्रीलंका याही पेक्षा लवकर पूर्वपदावर येईल अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली . आंतराष्ट्रीय नाणेनिधीची बंधने असल्याने आम्हला रशियाकडून नैसर्गिक इंधनाची आयात करण्यावर प्रचंड बंधने आहेत जर त्यात काही प्रमाणत सवलत मिळाल्यास श्रीलंकन सरकारचा खर्च काहीसा कमी होऊन श्रीलंका पूर्वपदावर येण्याच्या प्रक्रिय