पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्वस्थ शेजार !

इमेज
        आपल्या भारतात आगामी काळात होणाऱ्या विविध राज्यातील आणि महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांवरून राजकारण रंगत असताना भारताच्या पश्चिमेकडच्या शेजाऱ्याकडून चिंतेत वाढ करणाऱ्या दोन बातम्यांनी भारताच्या भविष्यात प्रचंड अडचणी वाढून ठेवल्याचे दिसून आले आहे . या दोन्ही बातम्या पाकिस्तानविषयी आहे . त्यातील एक गोष्ट पाकिस्तानच्या राजकीय स्थैर्याशी  निगडित आहे तर दुसरी पाकिस्तानच्या आर्थिक घडामोडीशी निगडित आहे पाकिस्तान आपला शत्रू आहे म्हणूनच नव्हे  तर पाकिस्तानमधील छोट्यात छोट्या घडामोडींच्या आपल्यावर परिणाम होत असल्याने त्या आपणाला माहिती असणे आवश्यक आहे . माझे आजचे लेखन त्याविषयी .         तर मित्रानो पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आय च्या !!प्रमुख पदांवर कोणाची नियुक्ती करायची यावरून पाकिस्तानचे लोकनियुक्त इम्रान खान यांचे सरकार आणि लष्कर यांच्यात वाद निर्माण झाला आहे . ज्यामध्ये लोकनियुक्त सरकारने माघार घेतली असून लष्कराचा अधिकृत घोषणा नसली तरी विजय झाला आहे .ही घडामोड सुरु झाली ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अर्थात १० ऑक्टोबर रोजी, इम्रान खान यांच्या सरकारने  आय