पोस्ट्स

फेब्रुवारी ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चीनचा विळखा

इमेज
       आपल्या भारताच्या पुर्वेकडे असणारा जगातील क्षेत्रफळाने तिसरा मोठा देश, आपला प्रमुख शत्रू ,आपल्या भारताइतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश म्हणजे चीन. हा चीन आँक्टोपस ज्याप्रमाणे आपल्या सभोवतालचा प्रदेशात आपले पाय पसरवून आपले भक्ष्य भक्षण करतो. त्याचप्रमाणे आपल्या भारताच्या सभोवताली आपले जाळे पसरत आहे, हे आपणास ज्ञात आहेच. नुकतेच या चीनरुपी आँक्टोपसने रम्य ही स्वर्गाहुन लंका या भावगीतात वर्णन केलेल्या लंकेला अर्थात श्रीलंकेला आपला विळखा घातला आहे.            तर मित्रांनो, द हिंदू या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनूसार श्रीलंकेने त्यांचा अति उत्तरेकडे असणाऱ्या जाफना या प्रातांतील तीन बेटांवर चीनला विद्युत प्रकल्प उभारण्यास 18जानेवारी रोजी मंजूरी दिली आहे. या तीन बेटापैकी आकाराने सर्वात मोठे असणारे बेट तामिळनाडूपासून फक्त 26.997 नाँटिकल मैल किंवा 50 किमी अंतरावर आहे.(नाँटिकल मैल हे समुद्रातील अंतर मोजण्याचे अंतर आहे. एक नाँटिकल मैल म्हणजे 1.85 किमी)आणि हे कोणत्या स्थितीत घडतेय? तर  कर्ज न फेडता आल्यामुळे श्रीलंकेचे हंबनपोट्टा हे बंदर श्रीलंकेने 99 वर्षासाठी चीनला दिले आहे. यावरुन श्रीलं