पोस्ट्स

ऑगस्ट ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवाची उलटी गणना सुरु

इमेज
        मानवाची उलटी गणना तर  सुरु झाली नाहीना ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घटना सध्या पृथ्वीवर घडत आहेत .युरोप खंडाच्या सुमारे ६३% भूभागावर येत्या नजीकच्या काळात मोठा दुष्काळ पडण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे . आज हा मजकूर लिहीत असताना (ऑगस्ट २०२२) सुमारे ६० % भूभागावर आताच कमी पाऊस झाला आहे . ड्रोन आणि विमानांनी टिपलेल्या छायाचित्रात युरोपातील अनेक महत्त्वाच्या नद्या मोठ्या प्रमाणत आटलेल्या दिसत आहे . युरोप खंडातील अनेक देशात गेल्या कित्येक दशकातील  सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे युरोप खंड तसा थंड तापमानाचा प्रदेश ओळखला जातो जिथले उन्हाळ्यातील सर्वसाधारण कमाल तापमान २२ ते २८ अंश सेल्सियस दरम्यान असते मात्र या वर्षी स्पेन युनाटेड किंग्डम फ्रांस स्पेन  या देशात ४० अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहेत . या वाढत्या तापमानमुळे फ्रांस या देशात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहे ज्यामुळे वातवरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्सिएड हा वायू सोडला जात आहे ज्यामुळे तापमान वाढण्यास हातभरातच लागत आहे   युरोपातील नद्या तेथील तेथील अर्थव्यवस्थेत  मोठे योगदान देता