पोस्ट्स

मे १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थशास्त्रातील गुंतागुंत सहजतेने मांडणारे पुस्तक अर्थात

इमेज
  एखाद्या विषयात प्रचंड गुंतागुंत असली,  तरी तो विषय रंजकतेने मांडल्यास विषय समजून घेणाऱयांवर या गुंतागुंतीचा काहीही परिणाम नाही, त्यांना संबंधित विषय सहजतेनं समजतो  मराठी साहित्य विश्वात ज्येष्ठ साहित्यिक  पु. ल . देशपांडे यांनी अजरामर केलेल्या चितळे मास्तर आणि हरि तात्या ही अवघड विषय सोपा करणारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली तर वावगे वाटायला नको हरितात्यानी इतिहास कश्या प्रकारे शिकवला तर रंजकता येते ज्यामुळे तो विषय सहजतेने समजतो हे आपल्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले . चितळे मास्तरांनी लहान मुलांना विद्याभ्यासाची सवय कशी लावावी हे दाखवून दिले . आता साहित्यविश्वात अजरामर झालेल्या या व्यक्ती प्रत्यक्षात  अस्तित्वात होत्या का ? कि हि फक्त कल्पना होते हे पु. ल देशपांडेचंच जाणो . सध्याच्या वर्तमानात अशी विषयातील क्लिष्टता दूर करून मराठीत वाचकांना विषय रंजकतेने समजवणारा लेखक कोणता ? याची माहिती घेतल्यास एक नाव चटकन समोर येते ते म्हणजे अच्युत गोडबोले .नुकतेच त्यांनी अर्थशास्त्रातील क्लिष्टता दूर करण्यासाठी लिहलेले "अर्थात हे पुस्तक मी वाचले           अर्थशास्त्र अवघड वाटण्याचे कारण म्ह