पोस्ट्स

जुलै १४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी

इमेज
           आपल्या भारताची रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे म्हणून ओळखली जाते . भारतीय रेल्वेत रोज ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढे लोक प्रवास करतात . भारतीय रेल्वेरुळांची एकत्रित लांबी एक लाख पंधरा हजार किलोमीटर आहे . भारतीय रेल्वे जगातील क्रमांक एकची सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार देणारी संस्था आहे अशी माहिती आपण नेहमीच ऐकतो . मात्र एव्हढीच भारतीय  रेल्वेची ओळख नाही त्यापेक्षा भारतीय रेल्वेची ओळख  ही  फार मोठी आहे . त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच .        भारतीय रेल्वेच्या तब्बल 16 उपकंपन्या आहेत . मी उपकंपन्या म्हणतोय हे लक्षात घ्या  , रेल्वेचे झोन आणि डिव्हिजन म्हणता नाहीये . रेल्वेचे झोन ,डिव्हिजन आणि रेल्वेच्या उपकंपन्या या पूर्णतः वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही  गोष्ट लक्षात घ्या . तर या 16 कंपन्या रेल्वेसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवतात अथवा उत्पादने तयार करतात . काही कंपन्या भारतासाठी परकीय चलन देखील मिळवून देतात . सर्वप्रथम आपण या कंपन्यांची नावे बघू नंतर त्यांची सविस्तर  ओळख करून घेऊ( 1) RITES(2)IRCON (3)CRIS (4)IRFC (5)CONCOR (6)KRCL (7)Railtel (