पोस्ट्स

जून २६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्पर्धा परीक्षा

इमेज
            दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . एका मराठी वृत्तवाहिनीवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालाचा अनुषंगाने एक चर्चात्मक कार्यक्रम प्रक्षेपित झाला . कार्यक्रमाचा सर्वसाधारण सूर यात स्पर्धा परीक्षांमध्ये किती विद्यार्थी प्रविष्ट होतात ? आणि अंतिम यादीत निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असते?  या संख्यात्मक तफावतीवर भाष्य करणारा होता . यामध्ये जी आकडेवारी सांगण्यात आली होती . ती फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा लोकप्रिय  या सदराखाली गणल्या जाऊ शकतील अश्या नागरी सेवा परीक्षेचा आढावा घेऊन सांगण्यात आली होती.जी खरोखरीच मन हेलावून टाकणारी होती .  ज्याद्वारे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणे म्हणजे गैर असा  गैरसमज होण्याची दाट  शक्यता आहे . जे काही अंशी खरेही आहे . मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या न्यायाने  याची दुसरी बाजू मांडण्यासाठी सदरचे लेखन .                 महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध परीक्षा घेतल्या जातात . मात्र सर्वसाधारण जनतेमध्ये या विषयी अत्यंत कमी माहिती असते . बहुतेक जणांना या द