पोस्ट्स

ऑगस्ट २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संघर्षाचे ६ महिने

इमेज
         २०२२ फेब्रुवारी २० ही फक्त एक तारीख नाहीये . अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांच्या राजकारणात युक्रेन या देशाचा बळी जाण्याची सुरवात होण्याचा तो दिवस आहे याच दिवशी रशियाने युक्रेन या देशावर आक्रमण केले आज ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवाड्यत या युद्धाला सहा महिने पूर्ण होत आहे अजूनही हे युद्ध सुरु आहे . युद्धाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये रशिया हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या दिवसात रशिया युक्रेनला पूर्णतः जिंकून घेईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता . मात्र विविध देशांच्या शस्त्रात्रांच्या  मदतीने युक्रेन हे युद्ध सहा महिने झाले लढत आहे . युद्धाच्या सुरवातीला  अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना  नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशनचे सैनिक लढायला येतील अशी युक्रेनसह जगाची अपेक्षा होती . मात्र अमेरिका युद्धात उतरली तर  जगात तिसरे महायुद्धाचं सुरु होईल असे सांगत नाटोचे सैन्य युक्रेनच्या मदतीला आलेच नाही याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांनी जाहीर टीका सुद्धा केली होती अमेरिका जरी प्रत्यक्ष या युद्धात उतरलेली नसली तरी अमेरिकेने युक्रेनला शस्त्रात्रे मदत