पोस्ट्स

डिसेंबर ९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

50 वर्षे अभिमानाची ( भाग 2)

इमेज
          आपल्या भारताच्या लष्कराने बांगल देशाची निर्मिती करण्याचा घटनेला या 2020 वर्षात 49 वर्ष पुर्ण होवून 50 वे वर्षे सुरु झाले. या निमित्ताने भारतीय लष्कराचे मनःपुर्वक आभार. तसेच या घटनेत अप्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षरीत्या सहभाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन. या घटनेमुळे अनेक बदल झाले.         ज्यामध्ये पाकिस्तानचा आर्थिक प्रगतीचा दर झपाट्याने कमी होणे. पाकिस्तानच्या इतर असंतुष्ट गटांना त्यामुळे प्रेरणा मिळणे भारताच्या लष्करी आणि कुटनितीच्या ताकदीच्या प्रत्यय सर्व जगाला येणे, या प्रमुख गोष्टी होत्या .असो.        पाकिस्तानची नविन राजधानी इस्लामाबाद उभारताना लागलेल्या पैश्यापैकी जवळपास सर्वच पैसे, हे त्या वेळच्या पुर्व पाकिस्तानातील तागाची इतर देशांना निर्यात करुन मिळवले होते. आपण पाकिस्तानचा आर्थिक वृद्धीचा दराचा विचार करता 1971 चा आधीचा पाकिस्तानचा आर्थिक वृद्धी  दर आशियातील सर्वात जास्त आर्थिक वृद्धी दर असणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये मोडला जात असे.(राजकीय स्थैर्य मात्र नसल्यागतच होते .1947 ते 1959 पर्यंत 7 पंतप्रधान बदलले गेले. 1958 च्या लष्करी  उठावामुळे 1959 साली पाकिस्तानातील पंतप्