पोस्ट्स

सप्टेंबर २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रम्य ही स्वर्गाहुन लंका ?

इमेज
     आपल्या मराठीत एक अत्यंत मस्त गाणे आहे." रम्य ही स्वर्गाहुन लंका, " 1960 साली आलेल्या 'स्वयंवर झाले सितेचे' या मराठी चित्रपटातील पंडीत भीमसेन जोशी यांनी गायलेले आणि गदिमांनी रचलेले हे गाणे. लंकेची रावणाचे राज्य असताना असलेली  श्रीमंती सांगणारे हे गाणे.  आपल्या मराठीत सुद्धा सोन्याचा वीटांसाठी लंकेचीच निवड केली आहे. एकंदरीत लंका ही समृद्ध देशांमध्ये मोडणारी असावी असे यावरुन  समजते.    आजमितीस मात्र ही लंका सध्या नरकाहुन वाईट अस्या स्थितीत आली आहे. तेथील जनता शद्बशः लंकेची पार्वती सारखे झाली आहे. मी हा मजकुर लिहीत असताना ( गुरुवार 2 सप्टेंबर रोजी)20 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात परकीय चलन फक्त 28 कोटी अमेरिकी डाँलर इतकेच शिल्लक आहे. ज्यातील 15 कोटी अमेरीकी डाँलर त्यांना 2021 च्या अखेरीपर्यंत चूकवायचा कर्जासाठी खर्च करणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच उरलेल्या 13 कोटी अमेरिकी डाँलरमधूनच त्यांना आपल्या जनतेची पोट भरावयाचे आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था मुख्यतः पर्यटनावर अवलूंबून आहे. सध्याचा कोरोना साथीमुळे पर्यटन बंद आहे. परीणामी अर्थाजनाचा मुख्य स्त्रोत बंद आहे. श्रीलंकेम