पोस्ट्स

जानेवारी ९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या लोंढ्याना आवरणे काळाची गरज (भाग 3 )

इमेज
            काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे , जेव्हा महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यात तणाव निर्मण झाल्याने दोन्ही राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची सेवा बंद होती . त्या वेळेस  एक महाराष्ट्र एसटी प्रेमी म्हणून मी महाराष्ट्र एसटीचे किती नुकसान झाले असेल? असा विचार आल्याने  म्हणून जेव्हा माहिती गोळा करण्यास सुरवात केली तेव्हा छातीत धस्स व्हावे अशी आकडेवारी माझ्यासमोर आली . महाराष्ट्राच्या एसटीला धोका म्हणून खाजगी बससेवांकडे बोट दाखवले जाते मात्र ते अयोग्य असून महाराष्ट्र एसटीला खरा धोका अन्य राज्यांच्या परिवहन सेवांकडून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ती आकडेवारी होती . मला समस्त कर्नाटकची आकडेवारी मिळाली नाही फक्त बेळगाव या शहराची आकडेवारी मिळाली , मात्र शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने समस्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तोच न्याय लावायला हरकत नसावी . तर मित्रानो , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या 16 मार्गावरून बसेस बेळगावला जातात . तर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस बेळगावहून 31मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करतात . या सर्व मार्गांची माहिती मी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी द