पोस्ट्स

जून १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किमान यांची आठवण ठेवत अन्न नासाडी टाळा

इमेज
             आपण आफ्रिका खंडाचा नकाशा बघितला तर आफ्रिका खंडाच्या ईशान्येला गेंड्याच्या शिंगासारखा भाग दिसतो या भागाला सुद्धा  हॉर्न (गेंड्यांच्या शिंगाला हॉर्न म्हणतात ) ऑफ आफ्रिका म्हणतात.  सोमालिआ केनिया इथोपिया आदी देश या भागात येतात सध्या या भागात  मन हेलावून टाकेल अशी  अन्न टंचाई निर्माण झाली आहे  या भागात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाऊस न पडल्याने शेती जवळपास संपलीच आहे शेती नसल्याने तेथील अन्नधान्याची गरज हि युक्रेन या देशातून अन्नधान्यआयात करून भागवली जात होती या भागाच्या एकूण गरजेच्या सुमारे ९८% गरज ही युक्रेन देशातून भागवली जात होती  रशिया युक्रेन युद्धामुळे ही आयात पूर्णतः बंद झाली आहे परिस्थिती इतकी वाईट आज की या भागात दर ४८ सेकंदाने एक भूकबळी जात आहे . तासाला ७२ लोक अन्न नसल्याने प्राणास मुकत आहेत . हॉर्न ऑफ आफ्रिका भागातील देश आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब आहेत त्यामुळे या देशांकडून इतर सधन देशाकडून अन्नधान्य आयात करण्यावर सुरवातीलाच अनेक बंधने आहेत त्यातच निसर्गाने देखील त्यांच्याशी सवतासुभा उभा केल्याने त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे अमेरिका रशिया आदी महासत्ता त