पोस्ट्स

ऑक्टोबर १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलता दक्षिण आशिया

इमेज
                 गेल्या आठवड्याभरात भारतातील माध्यमे तनिष्कची जाहिरात, टीआरपीचा घोटाळा आदी  विविध विषयांचे वार्तांकन करण्यात गुंतून गेली असताना भारताच्या दृष्टीने सकारात्मक म्हणता येईल अश्या घटना बांगलादेश आणि नेपाळ मध्ये घडल्या . मात्र या विजय साजरा करावा अश्या घटनांचे म्हणावे असे वार्तांकन मराठी माध्यमांमध्ये न आल्याने माझे आजचे लेखन या मुद्यांची माहिती देण्यासाठी .          तर मित्रानो , आपला पाकीस्तानपेक्षा धोकादायक शत्रू असणारा चीन गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सभोवताली असणाऱ्या देशांना विविध प्रकारे मदत करून, त्या देशांमध्ये विविध विकास प्रकल्प उभारून त्यांच्याभोवती आपला फास गुंडाळीत आहे. याच मालिकेत त्याने श्रीलंकेतील हंबनपोट्टा हे बंदर विकसित केले . मात्र हंबनपोट्टा हे बंदर विकसित करताना चीनने छुप्या पद्धतीने लादलेल्या अटी पूर्ण न करता आल्याने श्रीलंकेला हंबनपोट्टा हे बंदर  99 वर्षासाठी चीनला वापरण्यास देणे भाग पडले आहे .श्रीलंकेतील हंबनपोट्टा बंदराप्रमाणेच बांगलादेशातील सोनाडीया हे बंदर विकसित करण्यासाठी चीन प्रयत्नशील होता . त्यासाठी चीन सन 2006 पासून बांगलादेशाबरोबर विवि