पोस्ट्स

सप्टेंबर १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःची जावबदारी घेण्यास कधी शिकणार आपण ?

इमेज
            भारतातील ज्येष्ठ उदयॊजक सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन झाल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुढे कर मध्ये बसताना मागील अबाजूस बसणाऱ्या लोकांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्याच्या निर्णय जाहीर केला .  मागील सीटवरील प्रवाश्यानी सीटबेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांना मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली . या निर्ययाचे समाज माध्यमात  नकारात्मक प्रतिक्रिया देऊन स्वागत करण्यात आले. .खड्डेविरहित रस्ते , एकाच सलग लेनचे रस्ते रस्त्याच्या कडेला यॊग्य त्या मार्गदशक खुणा पहिले द्या मगच सिटबेल्टची सक्ती करा. स्वतःच्या जवाबदाऱ्या नीट पार पडायच्या नाहीत . मात्र सर्वसामान्यांना छोट्याशा चुकीसाठी मोठाला दंड लावायचा ही प्रशासनाची योग्य पद्धत नाही . यामुळे फक्त वसुली राज्याची  निर्मिती होईल . शहरात जिथे फक्त  १५ ते २० किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवावी लागते तिथे मुळात सिटबेल्टची गरजच नाही मात्र यामुळे फक्त घरापासून कोपऱ्यावर भाजी आणायला गेलो तरी त्या जेमतेम १००, २०० मीटरच्या अंतरासासाठी रस्त्यावर उभे राहून पोलीस दंड करतील अश्या प्रतिक्रिया या बाबत समाज माध्यमावर उमटत ह