पोस्ट्स

एप्रिल १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची चुरस कायम

इमेज
    सध्या आपल्या भारतात आय पी एल चा ज्वर असला तरी जागतिक पातळीचा विचार करता समस्त जगताचा नजारा बुद्धिबळाचा विश्वविजेता कोण होणार ? याकडे लागलेल्या आहेत .विद्यमान विश्वविजेता   मॅग्नस कार्लसन यांनी त्यांना विश्वविजेता पदाची स्पर्धा खेळण्यात उत्सुकता नसल्याचे जाहीर केल्यावर पहिल्यादाच   होणारी ही स्पर्धा त्यामुळे विशेष ठरत आहे मागील विश्वविजेता पदाचा आव्हानवीर नेपोमनिशी आणि या वर्षाचा विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर ठरवण्यासाठी झालेल्या कॅन्डीडेट स्पर्धेचा विजेता डिंग लिरेन यांच्यात ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे   काझकिस्तानमधील   अस्ताना शहरात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण १४ डाव खेळवण्यात   येणार असून खेळाडूंना जिंकल्यास एक गुण तर सामना बरोबरीत सुटल्यास अर्धा गुण देण्यात येणार असून जो खेळाडू सर्वप्रथम साडेसात गुणांची कमाई करेल त्यास विश्वविजेता म्हणून जाहीर करण्यात येणार आहे रविवार १६ एप्रिल सायंकाळचा विचार करता स्पर्धेत ६ डाव खेळण्यात आलेले असून दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी दोन विजय आणि दोन डावात बरोबरी असे एकूण ३-३ गुण झाले आहेत दोन्ही खेळाडूंचे स्पर्धा साधरणतः मध्यावर आली.असताना समान