पोस्ट्स

सप्टेंबर ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपटातील गीत ते 2+2 बैठक, मार्गे G-4 भारत जपान मैत्रीचा प्रवास

इमेज
   जपान , उगवत्या सूर्याचा देश , जगात सर्वाधिक भूकंप होणारा देश , भारताच्या चीनविरोधी आघाडीतील महत्त्वाचा देश , जुन्या हिंदी चित्रपटातील     सिने दिगर्शक ज्या   देशाच्या अल्पावधीत झालेल्या प्रगतीमुळे   भारावून गेले तो देश म्हणजे जपान , आत्ताआत्ता पर्यंत भारतातील बाळ गोपाळांच्या करमणुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या डोरेमॉन , सिंच्यान निज्जा हतोरी आदी अनेक कार्टून चा निर्माता असणारा देश म्हणजे जपान , स्वामी विवेकानंद यांनी ज्या२ देशाचा उल्लेख सध्या ते   निद्रिस्त   ड्रॅगन   आहेत जे उठल्यावर     जगाची झोप उडवतील अशा उल्लेख केला होता त्यातील एक देश म्हणजे जपान . ज्या देशाबरोबर आपल्या भारताच्या नियमित बैठका होतात अश्या जगातील मोजक्या देशांपैकी एक म्हणजे जपान ज्या देशाच्या तांत्रिक साह्यावर आपल्याकडे अनेक सोईसुविधा उभारण्याचे कार्य सुरु आहे तो देश म्हणजे जपान .     येत्या ७ सप्टेबरपासून   भारताचे    परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि सरंक्षण मंत्री राजनाथसिंग हे दुसऱ्या भारत जपान २ +२ बैठकीसाठी टोकियोला जाणार आहेत याच्या आधीची भारत जपान २+२ मिटिंग ही नोव्हेंबर २०१९ रोजी नवी दिल्लीत झाली होती ७

..... आतातरी ही यादी थांबेल ना ?

इमेज
          संत गाडगेबाबा, शैक्षणिक  पदवी घेण्याचा विश्वविक्रम  करणारे  श्रीकांत जिचकर, भाजपाचे महाराष्ट्रातील महत्तवाचे नेते गोपिनाथ मुंडे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर शांताबाई काळे अभिनेत्री भक्ती बर्वे , ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश चपळगावकर , मराठा समाजबांधवांचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे आणि आता ज्येष्ठ उद्योजक सायरस मिस्त्री . वरवर बघायला गेलो या व्यक्तींनी ज्या क्षेत्रात कार्य केले, त्याचा एकमेकांशी काहिही अर्थ नाही. पण एका दुर्देवी धाग्याने ही सर्व व्यक्ती गुंफली गेली आहेत, तो धागा आहे ,या सर्वांचे निधन हे रस्ते अपघातात झाले आहे. ही मोठी माणसे फक्त एका हिमनगाचे वरचे टोक आहे. जर अस्या मोठ्या व्यक्तीमत्वाच्या  रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची यादी करायची झाल्यास ती यापेक्षा अधिक मोठी सहजतेने करता येईल.क्राँग्रेसचे छत्तीसगढ मधील नेते सचिन पायलट सारख्या रस्ते अपघातात मृत्युमुखी न पडलेल्या मात्र जिवनभराचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींचा विचार करता या यादीत शेकडो नावे समाविष्ट करता येतील. प्राणास मुकल्यामुळे किंवा जीवनभराचे अपंगत्व आल्याने या व्यक्तींचे कार्य एकतर संपले किंवा त्यात प्रचं