पोस्ट्स

जून १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपल्या एसटीची ही वाटचाल कोणत्या दिशेने ?

इमेज
      आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधीक काळ चाललेला आणि आपल्या भारताचा विचार करता कोणत्याही सार्वजनिक उपक्रमातील  सर्वात चर्चित असा दुसरा संप (पहिला क्रमांक रेल्वेच्या ऐतिहासिक संपाला) म्हणून एसटीचा संप ओळखला जातो. आपल्या एसटी  कर्मचाऱ्यांंचा संपानंतर एसटीचा  गाडा पुर्वपदावर येत असताना , एसटी कर्मचाऱ्यांंनी त्यांचा साडेपाच महिन्याचा संपादरम्यान व्यक्त केलेली भिती प्रत्यक्षात तर येणार नाही ना ? असी घटना घडलेली आहे.      या संपादरम्यान एसटीचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे वारंवार बोलले गेले. एसटी महामंडळाच्या सांगली विभागाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या एका निविदेमुळे ही शक्यछा प्रत्यक्षात येण्याची निर्माण झाली आहे. सांगली विभागामार्फत प्रकाशित निविदेत सांगली विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध आगारांसठी कंत्राटदरांकडून साध्या गाड्यांसाठी हो साध्या गाड्यांसाठी प्रस्ताव मागितले आहेत. शिवनेरी आणि शिवशाही प्रकारच्या गाड्या खासगी कंत्राटदाराकडून चालवल्या गेल्यानंतर आता सर्व सामान्यांची लालपरी सुद्धा आता खासगी कंत्राटदारांचा हातात दिली जात आहे. महाराष्ट्र एसटीमधील हा पहिलाच प्रयोग आहे. या