पोस्ट्स

जानेवारी २९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस

इमेज
             आपल्या महाराष्ट्राला अत्यंत गौरवशाली इतिहास  लाभलेला आहे हे आपण जाणताच,  त्याचप्रमाणे अनेक भौगोलिक चमत्कार सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहेत . त्यामुळेच असेल कदाचित देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि हे सर्व जर आपणास एकाच वेळी बघायचे असेल तर .? आपणास महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला अर्थात अहमदनगर जिल्ह्याला भेट देणे क्रमप्राप्त आहे .  काय नाही,  अहमदनगर जिल्ह्यात ?संत ज्ञानेश्वर यांना लोकभाषेतून गीतेवरील भाष्य स्फुरले ते याच अर्थात अहमदनगर जिल्ह्यात अख्या भारताला सहकाराच्या मंत्र याच अहमदनगर जिल्ह्यातून देण्यात आला .  कोळशाच्या राखेतून उभारलेले भारतातील पहिले धरण  भाटघर धरण हे याच जिल्ह्यातील . एक महत्वाचा नैसर्गिक चमत्कार असणारे 4 एकरावरील वडाचे झाड याच जिल्ह्यातील . या  अश्या विविधतेने नटलेल्या जिल्ह्याचे मुख्यालय अर्थात अहमदनगर शहराची बातच काही और . एकेकाळचे उत्कृष्ठ शहरनियोजनाचा मापदंड ठरवणारे शहर म्हणजे अहमदनगर , आपल्या भारतातील सर्व प्रकारच्या  वाहन कंपन्यांना त्यांचे कोणतेही नवीन प्रकारचे वाहन  बाजारात आणण्याच्या अगोदर ज्या