पोस्ट्स

मे २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोळीबार कधीपर्यत!

इमेज
   मंगळवार 24 मेची अमेरीकन नागरीकांचा दुपारनंतरचा वेळ एका वाईट घटनेमुळे काहीसा काळवंडला.टेक्सास राज्यातील मेस्किको देशाच्या सिमेपासून एक तासाच्या अंतरावरील एका गावात एका 18वर्षीय नवप्रौढाने केलेल्या गोळीबारात 21 जणांना प्राणास मुकावे लागण्याची ती घटना होती. या21 जणांपैकी 19 जण 7 ते10  वयोगटातील बालके होती. तर 2 जण प्रौढ नागरीक होती. 24मे रोजी घडलेली शाळेतील गोळीबारीची ही 288वी घटना होती.2012 पासूनचा शाळेतील गोळीबाराच्या घटनेचा विचार करता ही घटना दुसरी भयानक घटना होती. यानंतर दुखवटा म्हणून अमेरीकेतील सर्व सरकारी कार्यालयातील ध्वज 28 मेपर्यत अर्ध्यावर आणण्याचे आदेश बायडेन प्रशासनाने दिले. त्यानंतर तातडीच्या स्वरुपात राष्ट्राला केलेल्या आपल्या संबोधनात राष्ट्रपती बायडेन यांनी गोळीबाराच्या वाढत्या घटना बघता यावर लगेच विनाविलंब पाउले उचलण्याची गरज बोलून दाखवली.       तसी या आधी देखील यावर अनेकदा अमेरिकेत विचारमंथन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष शस्त्र वापरण्याचे नियम कडक करण्याबाबत काही कार्यवाही झाली नाही. अमेरीकेतील राजकरणात मोठा वरचष्मा असलेल्या गनलाँबीने ते होवू दिले नाही. त्यामुळे आप