पोस्ट्स

जून २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता तरी आपण जागे होणार का ?

इमेज
         आता तरी आपण जागे होणार का ? असा प्रश्न पडावा ? अश्या घडामोडी सध्या ईशान्य भारतात घडत आहेत जिथे तेथील सामाजिक प्रश्नाबाबत राजकीय प्रश्नाबाबत माहितीचा प्रचंड प्रमाणात अभाव असतो तिथे ती माणसे सध्या  कोणत्या प्रकारे जीवन जगत आहेत याची माहिती असणे तसे अशक्यच.  संघ परिवारातील विविध संघटनामुळे तेथील समाजाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे तेथील समाज देशाच्या मुख्य प्रवाहात येत आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती बघता त्या प्रयतांची गती प्रचंड प्रमाणत वाढविण्याची गरज असल्याचे सध्या ज्या बातम्या त्या भागातून येत आहे त्यातून प्रतीत होत आहे           सध्या सदर भागातील प्रमुख राज्य असणारे आसाम आणि मेघालय या राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे निसर्गाच्या रौद स्वरूपामुळे तेथील काही जणांना प्राणास देखील मुकावे लागले आहे .रेल्वे सारख्या मूलभूत सोयीसुविधां मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाल्या आहेत . ज्यामुळे मुळातच प्रगतीच्या दृष्टीने अन्य भारताच्या काहीसा मागे असणारा ईशान्य भारत प्रगतीबाबत पुन्हा मागे गेला आहे त्याना पुन्हा शून्यातून सुरवात करावी लागणार