पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रॅण्डमास्टरांची पासष्टी

इमेज
                                                              गेल्या आठवड्यात आपण सर्व जण विधानसभेच्या निवडणुकीच्या बातम्यांच्या  गदारोळात हरवून गेलो असताना,  भारतीय क्रीडा विश्वात एका नव्या ताऱ्याचा जन्म होत होता ,  आणि हा तारा महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला येत  होता हे विशेष . जगातील नवव्या  क्रमांकाच्या सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टरच्या रूपात हा तारा उदयास येत होता . रौनक साधुवाणी हे त्या ताऱ्याचे नाव . रौनक भारताचा ६५ वा ग्रँड मास्टर आहे . १३ वर्ष ९ महिने आणि २६ दिवसाचे असताना त्याने हा पराक्रम केला आहे . भारतीय युद्धकलेच्या पाश्वभूमीवर आधारलेला, भारतीय लोकांनी शोधलेल्या या खेळावर आता आता पर्यंत रशियन खेळाडूंचे वर्चस्व होते . ते मोडीत काढत आता अनेक भारतीय खेळाडू मोठ्या जोमाने पुढे येत आहेत . रौनक साधुवाणी हा त्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो . रौनक नागपूरच्या सेंट्रल पॉईंट या शाळेत शिकतो .   Isle of man –United Kingdom या बुद्धिबळ विश्वातील अवघड  समजल्या जाणाऱ्या काही स्पर्धांपैकी एक असणाऱ्या स्पर्धेत ११ व्या  डावात त्याने हि कामगिरी केली . ही स्पर्धा १० ऑक्टोबर ते