पोस्ट्स

नोव्हेंबर १९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या लोंढ्याना आवरायला हवे (भाग २ )

इमेज
                                                                         मित्रानो गेल्या  काही कालावधीत मी दोनदा नाशिक ते सुरत या दरम्यान प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला आपली महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्याची एसटी या दरम्यान काही फरक आढळले . ते तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखमालेतील हा दुसरा भाग , तुम्ही पहिला भाग या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता .                                        मला आढळलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य राज्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्ट्रात येण्याचे  अति प्रचंडप्रमाण आणि त्या तुलनेत आपल्या एसटी बसेस अन्य राज्यात जाण्याचे नगण्य प्रमाण . आपण रात्री पुण्याच्या स्वारगेटवर  बघा पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अधिक असतात . तीच गोष्ट  नाशिकच्या संदर्भात बोलायचे झाल्यास गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बाबत बोलता येईल . रात्री सव्वा आठ ते पावणे नऊ या अर्धा तासात नाशिकहुन सुरतला जाण्यासाठी गुजरातच्या ४ गाड्या उपल