पोस्ट्स

फेब्रुवारी ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान अस्थिरतेच्या विळख्यात !

इमेज
     पाकिस्तान सध्या अस्थिरतेचा विळख्यात सापडला असल्याचे सध्या तेथील घडामोडी बघता दिसून येत आहे. तेथील बलूचिस्तानमधील  फुटीरतावाद्यांनी काही दिवसापूर्वीच लाहोरचा अनारकली बाजारात स्फोट केला होता. पुण्याचा तूळशीबाग समकक्ष असणाऱ्या या  बाजारात झालेल्या स्फोटामुळे फारशी जिवित हानी झाली नव्हती. मात्र या स्फोटातून स्फुर्ती घेत, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीतर्फे 2 फेब्रुवारी रोजी रात्री  बलूचीस्थानमधील पांजगुर आणि नुशकी   या दोन शहरामध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला करण्यात आला .या हल्यानंतर बलूचीस्थान लिबरेशन आर्मीच्या टेलीग्राम अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार या मध्ये 100 पाकिस्तानी लष्करी जवान प्राणास मुकले आहेत. तर बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचे 4 जवान मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने ट्टिट करत, पाकिस्तानी लष्कराने फार मोठा दहशतवादी हल्ला झाल्या परतवून लावल्याबद्दल त्याचे  अभिनंदन केले आहे. आजमितीस या क्षेत्रात  पाकिस्तानी  माध्यमांसह सर्व माध्यमांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून अधिकृतपणे माहिती मिळत नाही. मात्र या विषयी