पोस्ट्स

ऑगस्ट १९, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काय फरक पडीतो बुवा

इमेज
नुकताच मी पुणे ते नाशिक प्रवास महाराष्ट्राच्या एशियाड प्रकारच्या बसने केला . त्याचे 365 रुपये इतके भाडे होते. मी या आधी एका ब्लाँग पोस्टमध्ये नाशिक पुणे साध्या गाडीचे भाडे 271 असल्याचा  उल्लेख केल्या असल्याचे आपणास स्मरत असेलच. प्रवाशादरम्यान  मला अनुभवयास आलेल्या अनुभवाचे कथन करण्यासाठी हा लेखनप्रंपंच  मलातरी एशियाड आणि सध्याची सुधारीत लालपरी अर्थात परीवर्तन मध्ये फारसा फरक जाणवलेला नाही. मात्र या दोघांमध्ये तब्बल 94 रुपयाचा फरक आहे. 1984 साली नवी दिल्ली येथे भरलेल्या एशियाड खेळाच्या पाश्वभुमीवर जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र परीवहन महामंडळाकडून देशाला आरामदायी प्रवासासाठी एशियाड या सेवेची ओळख करुन देण्यात आली. त्या वेळेस साधी गाडी आणि या आरामदायी सेवेमध्ये फरक असेलही  मात्र त्या नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय . सध्या पुर्वीच्या लाल डब्यात लांक्षणीय सुधारणा झाल्या आहेत . त्यामुळे पुर्वीच्या दर्जातील तफावत खुप प्रमाणात कमी झालीये . मात्र भाड्यातील तफावत तशीच राहलीये . ती कमी व्हायवास हवी . असे मला वाटते .आपणास काय वाटते ?

माझ्या गुजरातच्या एस टी प्रवासाची हकिकत

नुकताच मी आरक्षण करुन गुजरात राज्य परीवहन महामंडळाच्या बसने नाशिकहून पुण्याला प्रवास केला . या दरम्यान आलेले अनुभव तूम्हाला सांगण्यासाठी हे लेखन. मला GSRTCची आवडलेली गोष्ट म्हणजे बस ट्रँकिंग प्रणाली . गुजरातच्या सर्व बसेसवर जि पी आर एस बसवलेले आहेत . त्यामुळे GSRTCच्या अँप्लीकेशनमध्ये तूमचा पि आर एन अथवा बस क्रमांक टाकला की तूमची बस कुठे आहे हे समजते . जी सुविधा मला तरी आपल्या एस टी मध्ये आढळत नाही .   माझे निरीक्षण अपुर्ण असल्यास सांगावे मला आनंदच होईल. मी मध्ये गाडी ब्रेकफास्टसाठी थांबली असता डायव्हरांबरोबर प्रवासी भाड्याचा विषय काढला असता त्यांनी सांगीतलेल्या उत्तरामुळे मी अनुत्तरीतत झालोय .ते म्हणाले तूम्ही गूजरात राज्यात अत्यंत स्वस्त फिरु शकतात. मात्र महाराष्ट्रात आम्हाला तूमच्य बरोबर दर ठेवावे लागतात. मागच्या वेळेस तूम्ही 225 रुपयात प्रवास केला आता 270 रुपये लागतात याला तूमचे प्रशासन जवाबदार आहे . तूम्हाला काय वाटते यावर ?