पोस्ट्स

डिसेंबर ११, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तोट्यास कारण की ........

इमेज
                   आपल्याकडे सर्वसाधारणपणे हा मथळा पत्रास कारण की असा असतो . मात्र तो इथे तोट्यास कारण की  ......... असा आहे . याला कारण आहे नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बाबतीत आलेली एक नकारात्मक स्वरूपाची बातमी . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन देण्यात आले असून जे काही वेतन त्यांना देण्यात आले तेही दर महिन्याला त्यांना ज्या दिनांकाला वेतन मिळते त्यापेक्षा दोन दिवस उशिरा देण्यात आल्याची ती बातमी होती . त्याला महामंडळाला झालेल्या तोट्याचे कारण देण्यात आले होते .  मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . माझा हा प्रवास वीक डे आणि शनिवार आणि रविवारी सुद्धा झालेला आहे . त्या दरम्यान मला आढळलेल्या काही बाबींच्या आधारे आपण या तोट्यामागच्या कारणांचा मागोवा घेतला असता समोर आलेले चित्र तुमच्यासमोर मांडण्यासाठी हे लेखन .                          मी शक्यतो रात्री नऊ ते मध्यरात्री   बाराच्या च्या दरम्यान प्रवाशाला  सुरवात करतो . मी यावेळी नेहमी वीक डे ला  बघतो की , प्रवाशी गाड्या या सुमारे 50 % भरलेल्या असून दे

काँफ्रेरन्स ऑफ पार्टीझ 25 (COP25 )च्या निमित्याने भारतीय जगत

इमेज
                                                            गेल्या आठवड्यापासून युरोप खंडातील स्पेन या देशाच्या राजधानीत अर्थात  मैड्रिड   मध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात हवामान बदल या विषयावर होणारी काँफ्रेरन्स ऑफ पार्टीझ(जीCOP या नावाने प्रसिद्ध आहे )  ही परिषद चालू आहे . यंदा या परिषदेचे  25 वे अधिवेशन चालू आहे सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत आणि समस्त मानवी जातीसमोरील प्रश्न म्हणजे हवामान बदल होय . आपण भारतीयही बेमोसमी पाऊसाच्या ( 1जून ते 30सप्टेंबर हा कालावधी सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला शास्त्रीय भाषेत बेमोसमी आणि माध्यमांच्या भाषेत  अवकाळी म्हणतात )रूपाने  त्याचा अनुभव घेत आहोत . मात्र जगातील 193 देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा  , जगातील क्षेत्रफळाच्या तुलनेत सातव्या क्रमांकाचा , अर्थव्यवस्थेच्या बाबतीत 10 व्या क्रमांकाचा , जगातील पहिल्या पहिल्या क्रमांकाचा लोकशाहीप्रधान देशात,  लोकशाहीच्या 4स्तंभापैकी एक असणाऱ्या मध्यांमध्ये याची पुरेशी दखल घेण्यात आलेली नाही , असे माझे निरीक्षण आहे . तरी जेजे आपणाशी ठाव ते सकळांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जना या समर्थांच