पोस्ट्स

ऑक्टोबर २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदलाच्या नावाने ...... !

इमेज
                सध्या  शाहरुख खान याच्या मुलास अमली पदार्थाच्या  पुरवठ्याविषयी संबंधितांना विचारणा केल्याप्रकरणी नॅशनल क्राईम ब्युरो (NCB ) तर्फे  दाखल गुन्ह्याच्या संदर्भात विविध दावे प्रतिदावे आणि दिवाळी निमित्य होणाऱ्या गर्दीच्या बातम्या दाखवल्या जात असताना  जगभरात मात्र हवामानबदलाविषयी मोठ्या प्रमाणवर तसेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनाच्या बाबत  चर्चा सुरु आहे . विविध देशांचे प्रमुख  हवामान बदलाविषयी काय कार्यक्रम असावा या बाबत मतप्रदर्शन करत आहे.   या विविध देशांच्या प्रमुखांमध्ये व्हॅटिकन सिटी या ख्रिस्ती बांधवांच्या साठी अत्यंत पुज्यनीय  असणाऱ्या देशाचे प्रमुख पोप फ्रॅंसिस यांच्या देखील समावेश आहे , बीबीसी रेडिओला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी जागतिक नेत्याना पर्यावरणाच्या या आणीबाणीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी आणि भावी पिढीला चांगले पर्यावरण राखण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला आहे . तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनासाठी  युरोपात जाण्यासाठी, निघत असताना केलेल्या पत्रकारांना संबोधित करताना या अधिवेशनाला ऐतिहासिक सं