पोस्ट्स

जून १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगाचे उद्याचे आशास्थान भारत

इमेज
   सध्या आपल्या भारतात लष्करात अल्पमुदतीची सेवा   देण्यासाठी,   केंद्र सरकारने आणलेल्या योजनेमुळे देशात वादंग उमटले असता, ना नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र धोरणाला नव्याने आकार देण्याच्या घडामोडीना   प्रचंड वेग आला आहे . या वर्षाच्या आरंभापासून सुरु असलेली आपल्या भारताला भेट देण्याची परदेशातील   विविध नेत्यांची मालिका वर्षाचा सहावा महिना सुरु झाला तरी चालूच आहे .          भारताने दक्षिण पूर्व आशियाई देशाची संघटना असलेल्या आसियान आणि भारत यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित होण्याचा घटनेला    30 वर्ष पूर्ण झाल्याच्या   स्मरणार्थ १६ आणि १७ जून रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते    ब्रुनेई , इंडोनेशिया मानयमार सिंगापूर कंबोडिया मलेशिया लाओस , थायलंड   व्हिएतनाम , फिलिपाइन्स या देशांची प्रादेशिक संघटना म्हणजे आसियान   या बैठकीसाठी या देशाचे परराष्ट्र मंत्री आणि महासचिव १६ आणि १७ जून रोजी नवी दिल्लीत उपस्थित होते यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यातील   अनेक मंत्