पोस्ट्स

नोव्हेंबर २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एसटी संपामुळे होरपळणारे दुर्लक्षित घटक

इमेज
          सध्या सुरु असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा  संप चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे ९०च्या दशकांत ज्याप्रमाणे मुबईतील गिरणी कामगारांचा संप गिरणीविश्व ज्या प्रमाणे उद्धवस्त करून गेला त्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप एसटीला पूर्णतः संपवून टाकेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . माध्यमांमध्ये या संपविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहे, त्यामध्ये या संपामुळे प्रवाश्यांना होणारा त्रास,  एसटीचे बस बंद असल्यामुळे होणारे आर्थिक  नुकसान या विषयी भरभरून बोलले गेले , अजूनही बोलले जात आहे . मात्र या सर्व गदारोळात एक घटक मात्र काहीश्या दुर्लक्षिला गेला, ज्या घटकावर फारच थोडे बोलले गेले , तो घटक म्हणजे  बस स्थानकाच्या परिसरात  विक्री करणारे विक्रेते तसेच परिसरात असणाऱ्या हॉटेल लॉज चालकांचे होणारे नुकसान .        कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आधीच लोकांचे पर्यटन  बंद झाले असताना , जे थोडेफार लोक बसचा वापर करत होते ते सुद्धा या संपामुळे एसटीपासून दुरावले . परिणामी आजमितीस या बस्थानकांच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल लॉज चालकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे .त्यांना आपल्या कामगारांचे पगा

बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग २ )

इमेज
            यशस्वी होणाऱ्या खेळाडूंमध्ये असाधारण गुणवत्ता असते. बुद्धिबळातील गुणवत्ता प्राप्त करताना असाधारण खेळाडू चटकन अथवा कमी वेळेत आणि सहजनतेने कौशल्य प्राप्त करतो . खेळाडू घडवताना प्रशिक्षकाने नकारात्मक विचार ठेवल्यास, खेळाडू घडवता येत नाही खेळाडूला नियमितपणे सकारत्मक विचारांशी जोडीनं घ्यावे लागते . येत नाही, जमत नाही, समजत नाही या गोष्टींना हद्दपार करावे लागते. कुठलाही खेळाडू सुरवातीलाच योग्य निर्यय घेऊ शकत नाही . टप्या टप्याने परिस्थितीचा ( Position) चा अभ्यास करवून घ्यावा लागतो .    या प्रक्रियेत मोठी  महत्वपूर्ण आणि महत्तपूर्ण जवाबदरी प्रशिक्षक पार पडतो . खेळाडू आणि पालकांशी नियमित संवाद साधने खेळाडूंच्या कमतरता शोधून त्यावर काम करणे , खेळाडूंची जिज्ञासावृत्ती वाढवणे त्यास नवनवीन ज्ञान उपलब्ध करून देणे ही जवाबदारी प्रशिक्षकाची असते. कोचेबीलिरी हा एक महत्त्वपूर्ण गुण खेळाडूंमध्ये असावयास हवा ,            योग्य तसेच जाणकार प्रक्षिक्षकाकडून खेळाडूने प्रक्षिशण घेतल्यास खेळाडू पुढे जाऊ शकतो . प्रक्षिशकावर विश्वास ठेवल्यास खेळाडूंच्या दर्जा वाढण्यास प्रगती होण्यास मोलाची मदत होते