पोस्ट्स

जुलै १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग5)

इमेज
सध्या आपल्या भारतात विविध मुद्यांवरुन विविध मतमतांतरे मांडली जात असताना जगाचे लक्ष एकाच गोष्टीकडे केंद्रीत झाले आहे. ते म्हणजे अफगाणिस्तान आणि त्यातील तालीबान.       नुकतेच तालीबानचे प्रवक्ते सोहेल सलीन यांनी चीन तालीबानचा मित्र आहे. तालीबान कोणत्याच प्रकारे सिंकीयांग राज्यातील फुटीरतावाद्यांना मदत करणार नाही. आमचा अफगाणिस्तानवर संपुर्ण नियंत्रण आल्यावर अफगाणिस्तानचा विकास करण्यासाठी आम्हाला चीनची मदतच होईल, असा विश्वास वाटतो, असे  जाहिर केले आहे. अर्थात या मागे तालीबानला आर्थिक मदत तसेच जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळण्यात  चीनचे साह्य होवू शकते.हा स्पष्ट हेतू आहे. अफगाणिस्तानची 35किलोमीटर रुंद आणि 110किमी लांब असणाऱ्या वाखान काँरीडाँर मार्फत चीन आणि भारताबरोबर सीमा लागते. अफगाणिस्तान बरोबर चीनची सीमा सिकीयांग (काही ठिकाणी उच्चार झिकियांग म्हणून केला जातो) या मुस्लिम बांधवांची संख्या बहुसंख्येने असलेल्या प्रांताला लागून आहे. या प्रांतातील मुस्लिम बांधवांवर चीन अत्याचार करतो, असा पाश्चिमात्य देशांचा दावा आहे.सुमारे 72वर्षापुर्वी हा भाग चीनच्या अधिपत्याखाली आला. या भागात चीनपासून स्वतंत्