पोस्ट्स

मार्च २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्यासा, एक उत्कृष्ट चित्रपट !

इमेज
कालच्या माझ्या "कागज के फुल " या चित्रपटावर मला तूझ्या आवडत्या चित्रपटावर लिही ना ? आम्हाला तूझा आवडत्या चित्रपटाविषयी वाचायला आवडेल असा अभिप्राय आल्याने माझ्या आवडत्या चित्रपटाविषयी  सांगण्यासाठी आजचे लेखन  तर माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे,  ज्येष्ठ सिने निर्माते, सिनेदिग्दर्शक ,अभिनेते, नृत्य दिग्दर्शक वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरुदत्त यांची प्रमुख भुमिका असणारा चित्रपट ज्याला टाइम्स मँगझीनतर्फे वीसव्या शतकातील सर्वात उत्तम 50 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे, असा कृष्णधवल चित्रपट "प्यासा". अत्यंत जवळचे लोकसुद्धा आपल्याला आपल्याकडे किती पैसा आहे, यावरुनच आपले मुल्यमापन करतात. गुणांकडे दुर्लक्ष करतात  मात्र आपल्या गुणांमुळे आपल्याला जर भविष्यात पैसा मिळाला ,आपला गौरव झाला तर आपल्या कष्टाच्या, धडपडीच्या वेळी  आपल्याला त्रास, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्ती, आम्हीच त्याला त्याचा धडपडीच्या काळात कसी मदत केली, याविषयी खोटे का असेना जगाला सांगतात. हा संदेश या चित्रपटातून सहजतेने देण्यात आला आहे. " सुखके साथी सब , दुखमे मे ना कोई" हा हे संतवचन आपण