पोस्ट्स

नोव्हेंबर ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे तूम्हाला माहिती आहे का ?

इमेज
                        सध्या भारताच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडी बघितल्यास एक गोष्ट सातत्याने आपल्या कानावर पडते,  ती म्हणजे भारताच्या जीडीपीच्या आकड्यांविषयी . भारताचा जीडीपी इतका झाला  तितका झाला असे आपण नेहमी ऐकतो , मात्र जीडीपी म्हणजे काय ? तो कमी जास्त होतो म्हणजे काय ? त्याचा कमी जास्त होण्यामुळे काय काय परिणाम होतो ? या विषयी फारच कमी लोकांना माहिती असते. माझे आजचे लेखन त्या विषयी माहिती देण्यासाठी .              जिडीपी अर्थात ग्रॉस डेमॉस्टीक प्रॉडक्ट  म्हणजे एका विशिष्ट कालावधीत (जो आता आता पर्यंत वर्ष  असे , मात्र आता  दर दोन महिन्याचा देखील जीडीपी मोजला जात असे ) एखाद्या देशात त्या देशात उत्पादित झालेल्या उत्पादने , सेवा यांचे अंतिम मूल्य होय . हे मूल्य काढताना त्या देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार होतो . त्या विशिष्ट देशातील नागरिकांनी इतर देशात कमावलेले मूल्य यात गृहीत धरले जात नाही . मात्र परदेशातील कंपन्यांनी त्या देशात उत्पादित केलेल्या उत्पादनाचे मूल्य यात मोजले जाते . उदाहरणार्थ  अतुल नावाच्या एखाद्या  अनिवासी भारतीयाने अमेरिकेत 1000 अमेरिकी डॉलर इतके उत्पन्न कमवले, आ

आत्महत्या !एक गंभीर समस्या

इमेज
                भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी हिमांशू राँय,अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज, भारताला काँफी पेयाची सवय लावणारे जी. व्ही. सिद्धांत,  ज्येष्ठ समाजसेविका शीतल आमटे , आप आपल्या क्षेत्रातील ही मान्यवर मंडळी. यांची क्षेत्रे वेगवेगळी असली तरी यामध्ये एक दुर्देवी साम्य आहे, ते म्हणजे या सर्व लोकांनी आत्महत्या करुन आपली इहलोकाची यात्रा संपवली.लौकिक अर्थाने या सर्व व्यक्ती सर्वसामान्यांचा दृष्टिने यशस्वी होत्या. अनेकांचे रोल माँडेल होत्या. मात्र  त्यांनी आत्महत्या केल्या.  दहा वर्षापुर्वी आलेल्या थ्री इडियट या चित्रपटात एका प्रसंगात विद्यार्थ्यांचा आत्महत्येची आकडेवारी सांगण्यात आली आहे. जी त्यावेळीच छातीत धस्स व्हावी, अशीच होती. ज्या प्रमाणे त्यावेळच्या इतर गोष्टीत वाढ झाली आहे, तसीच यामध्ये सुद्धा झाली आहे. यात शंका नसावी. त्यावेळच्या वर्तमानपत्राचे मथळे  आठवून बघा, रोज किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली , याच्या आकडेवारीने ते भरलेले असत.          आपल्याकडे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला दुबळे समजण्याची पद्धत आहे. त्याला जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची कुवत नसल्याने त्याने भ्याडपण