पोस्ट्स

नोव्हेंबर २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धनत्रयोदशी विशेष

इमेज
  बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात , ज्याच्या बाबतीत दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ,असे म्हटले जाते , त्या दिवाळीचा आज पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी . त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवशी वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरीची पुजा करुन आपल्या चांगल्या आरोग्याची मनोकामना केली जाते. धन्वंतरीकडे ,दिर्घायूसाठी प्रार्थना केली जाते .काही समाज घटकात आज धनाची देवता असणाऱ्या कुबेराचे पुजन केले जाते.  दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे  या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्यांचे डोळे दिप

जखमेवर मीठ !

इमेज
                १ नोव्हेंबर २०२० रोजी कर्नाटक राज्याच्या ६५वा स्थापना दिवस झाला . त्यानिमित्याने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना बेळगाव निपाणी भालकी या शहरातील आणि आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आपल्या संबोधनात त्यांनी महाराष्ट्र सीमाप्रश्न संपल्याचे आणि बॉम्बे कर्नाटक या प्रादेशिक भागाचे कित्तूर कर्नाटक असे नामकरण करत असल्याचे जाहीर केले . एकाचवेळी राज्याच्या संस्थापक दिनाला कोरोना संसर्गाची भीती न बाळगळता कार्यक्रम केले . मात्र मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावे या साठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावच्या कार्यक्रमला परवांनगी नाकारली . कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अत्यंत अत्याचार करण्यात येतात . त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द्व सक्तीने कन्नड भाषेत व्यवहार करण्यास भाग पाडले जाते . त्यामुळे तेथील जनता महाराष्ट्रात येण्यास आसुसलेली आहे .  भागाचे नाव बदलून या भागाशी असणारी महाराष्ट्राची नाळ पूर्णपणे तोडण्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे . अनेकजण कुठे पाकिस्तानात रह