पोस्ट्स

जुलै २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतात रंगणार ६४ घरांचा आखाडा

इमेज
         येत्या गुरुवार पासून अर्थात २८ जुलैपासून  आपल्या भारतात एक युद्ध बघायला मिळणार आहे या युद्धात आधुनिक शस्त्रात्रे वापरली जाणार नाहीत तर पारंपरिक  हत्ती उंट घोडा आणि एक वजीर  एका राजा तसेच पायी चालणाऱ्या सैनिकाचा यात वापर होणार आहे . महाभारतातील युद्ध १८ दिवस चालले  हे युद्ध पुढील १४ दिवस अर्थात १० ऑगस्टपर्यंत  चालणार आहे .या युद्धात जगभरातील १८८ देशांनी सहभाग नोंदवला आहे प्रत्येक देशाचे पाच  बुद्धिमान सैनिक हे युद्ध खेळणार आहे.  त्यांच्या मदतीला ६४ घरांच्या पटांगणात २ उंट २ घोडा २ हत्ती , एक वजीर आणि एका राजा आणि ८ साधे सैनिक असे साथींदार असतील  . या युद्धात सहभागी अस्नणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक यांच्या वापर करत प्रतिस्पर्ध्यावर मात करत या युद्धात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतील .   मी बोलत आहे चेन्नईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या महाबलीपूरम येथे २८ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाडविषयी . या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये गेल्या काही बुद्धिबळ ऑलम्पियाडचा विचार करता सर्वात जास्त १८८ संघ खुल्या गटात तर १६२ संघ महिला गटात एकमेकांशी सामना करणार आहे

इम्रान खान आंदोलनाचा दुसरा अंक सुरु !

इमेज
    पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेचे उपाध्यक्ष दोस्त मोहम्मद यांनी दिलेल्या एका निर्णयामुळे पाकिस्तान अशांत झाला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेतील पाकिस्तानी मुस्लिम लीग कायदे गट (PML Q) या पक्षाचे 10 सदस्य बहुमत सिद्ध करण्याचा प्रकियेसाठी करावयाचा मतदानासाठी अपात्र झाले.शुक्रवार 22 जूलै रोजी पाकिस्तानच्या पंजाबच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायच्या वेळी त्यांनी हा निर्णय दिला.पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेत, पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 63 च्या उपकलम ए नुसार त्यांनी हा निर्णय दिला. .या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री हमजा शरीफ यांची खुर्ची वाचली आहे. हमजा शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पुत्र आहेत. जर पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाच्या सदस्यांना मतदान करु दिले असते. तर हमजा शरीफ यांना पाय उतार व्हावे लागले असते,आणि पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गट आणि पाकिस्तान तेहरीके इंसाफ यांचे सरकार सत्तेत आले असते. जे अस्तित्वात न आल्याने पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाकडून पाकिस्तानात मुख्यतः त्यांच्या पंजाबमध्ये आंदोल